अंड्याचा वाद टोकाला गेला, दोन गटात वाद मग हाणामारी; त्यानंतर थेट…

एका दुकानात उधार अंडे खाण्यावरुन दोन गटात वाद सुरु झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यानंतर गोळीबार सुरु झाला. घटनास्थळाच्या जवळच पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

अंड्याचा वाद टोकाला गेला, दोन गटात वाद मग हाणामारी; त्यानंतर थेट...
अंड्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून गोळीबार
| Updated on: Feb 06, 2023 | 1:32 PM

औरंगाबाद : उधार अंडे खाण्यावरुन झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बिहारमधील औरंगाबादमध्ये घडली आहे. यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उधार अंडे खाण्यावरुन वाद

एका दुकानात उधार अंडे खाण्यावरुन दोन गटात वाद सुरु झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यानंतर गोळीबार सुरु झाला. घटनास्थळाच्या जवळच पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

गोळीबारात महिलेचा मृत्यू, आठ जखमी

या गोळीबारात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. अन्य आठ जण जखमी झाले. धर्मेंद्र राम, रीता देवी, करीमन राम, अशोक राम, रामजन्म राम, शिवनंदन राम, पंकज कुमार आणि कुंदन कुमार अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

तीन आरोपींना अटक, दोन फरार

याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन जण फरार आहेत.पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. शंभू चौधरी, उमेश चौधरी आणि रामबचन चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.