सावधान! अनोळखी व्यक्तीला घरात घेताय?, १०० वेळा विचार करा; गोरेगावमध्ये लाखोंची चोरी, नेमक काय घडलं ?

| Updated on: Apr 05, 2024 | 8:32 AM

आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून आई-वडिल आयुष्यभर झटतात. आणि त्यांच्या उतारवयात त्यांना आराम मिळावा, सुखी आयुष्य जगात यावं यासाठी मुलंही कष्ट करतात. आपल्या वृद्ध आईला बरं वाटाव म्हणून मालिश करून घेण्याचा विचार गोरेगावमधील एका सोनाराने केला. मात्र त्यांना तो उपचार फारच महागात पडला आणि लाखो रुपयांचा फटका बसला.

सावधान! अनोळखी व्यक्तीला घरात घेताय?, १०० वेळा विचार करा; गोरेगावमध्ये लाखोंची चोरी, नेमक काय घडलं ?
गोरेगावमध्ये लाखोंची चोरी
Follow us on

आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून आई-वडिल आयुष्यभर झटतात. आणि त्यांच्या उतारवयात त्यांना आराम मिळावा, सुखी आयुष्य जगात यावं यासाठी मुलंही कष्ट करतात. आपल्या वृद्ध आईला बरं वाटाव म्हणून मालिश करून घेण्याचा विचार गोरेगावमधील एका सोनाराने केला. मात्र त्यांना तो उपचार फारच महागात पडला आणि लाखो रुपयांचा फटका बसला. मनस्ताप झाला तो वेगळाच. असं नेमकं काय घडलं तिथे ?

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेला मालिश करण्यासाठी येणाऱ्या महिलेने त्यांच्या आजारी आईच्या अंगावरील सुमारे साडेचापर लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर त्यानंतर गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथे राहणारे सुभाष हे सोनार असून त्यांचं दागिन्यांचं दुकान आहे. त्यांच्या वृद्ध आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने शरीराची एक बाजू लुळी पडली होती. आईला मालिश करून, उपचारांच्या मदतीने तिला बरं वाटावं यासाठी सुभाष यांनी एका महिलेची नियुक्ती केली. त्याप्रमाणे सोनल नावाची ही महिला रोज त्यांच्या घरी येऊन वृद्ध महिलेला मालिश करून देत आसे. तीन दिवस नियमितपणे ती काम करत होती मात्र चौथ्या दिवशी काम संपवून लगबगीने ती निघून गेली.

ती गेल्यानंतर सुभाष यांची पत्नी बेडरूममध्ये आली असता त्यांना त्यांची वृद्ध सासू झोपलेली आढळली. मात्र त्यांच्या अंगावरील सर्व दागिने गायब झालेले होते. ते पाहून त्या हबकल्या. त्यांनी लागलीच त्यांच्या सासूबाईंना जागं केलं आणि दागिने कुठेत याबाबत विचारणा केली. मालिश करताना अडथळा होत असल्याने मालिश करणारी बाई, सोनल हिच्या सांगण्यावरून आपण दागिने काढून ठेवले असे तिच्या सासूबाईंनी तिला सांगितले. मात्र मालिश झाल्यावर सोनलने त्यांना पुन्हा ते दागिने घालून दिले नाहीत तर ती दागिने घेऊन फरार झाली हे सुभाष यांच्या पत्नीच्या लक्षात आले आणि त्यांना मोठा धक्का बसला. लाखोंचे दागिने गेल्याचं लक्षात येताच त्यांनी सुभाष यांना कळवल.

सुभाष यांनी तातडीने फोनवरून सोनल या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. अखेर सुभाष यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.