बंदुकीतून गोळी सुटली, आवाजाने परिसर हादरला, नंतर समजलं…

यवतमाळ जिल्ह्यात काल एक विचित्र घटना घडली आहे. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे.

बंदुकीतून गोळी सुटली, आवाजाने परिसर हादरला, नंतर समजलं...
yavatmal crime news in marathi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2023 | 11:33 AM

यवतमाळ : व्याजाच्या पैशातून काल यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात महिलेसह सात आरोपी पोलिसांनी (yavatmal police) ताब्यात घेतले आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी आवाजाने परिसर हादरला. काही जागृत लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी अक्षय सतीश कैथवास या तरुणाचा मृत्यू झाला होती. या प्रकरणातील सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बंदूक आणि इतर शस्त्र आरोपींच्या घरातून जप्त केली आहेत. पोलिस (yavatmal crime news in marathi) या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

व्याजाच्या पैशातून अक्षयची हत्या

यवतमाळ शहरात एका 27 वर्षीय युवकावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या व्याजाच्या पैशातून झाल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. अक्षय सतीश कैथवास असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी हसीना खान उर्फ लक्ष्मीबाई लीलारे, विजय लिलारे, गोलू लीलारे, खुशाल लीलारे, शरीफ खान, सोपान लीलारे, अजित दुंगे यांना ताब्यात घेतले आहे. या सात जणांनी एक प्लॅन करुन अक्षयची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.’

आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार

ज्यावेळी अक्षयची हत्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली, त्यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गर्दीत अनेकजण संतापले होते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तरी सुध्दा संतप्त जमावाने आरोपींच्या घरासमोरील गाड्या पेटवून दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात प्रत्येक आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे.