
तुम्हाला पैशांची गरज आहे आणि लोन घ्यायचं आहेत अशात तुमची नजर तुमच्या पेन्शन फंड किंवा पीएफ फंडवर पडते. तुम्हाला तुमच्या पेन्शनमधून अधिक पैसा काढायचा असेल,म्हणजे तुमचे काम होणार याची तुम्हाला खात्री असते. त्यामुळे दुसऱ्यांकडे हात पसरण्याची तुम्हाला काही आवश्यकता पडणार नाही.अशा स्थितीत तुमची नजर एखाद्या वेबसाईट किंवा ईमेल वा एसएमएसवर जाते आणि तुमचे अकाऊंट खाली होते….असा फ्रॉड सध्या सायबर ठकांकडून सुरु आहे.
जे असा दावा करतात करतात की पेन्शनचा संपूर्ण फंड काढून देतात तुमची मदत करतील अशांपासून सावध रहा. PFRDA ने ( पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी) सावधान केले आहे. पब्लिक नोटिस जारी करुन लोकांना अपिल केली आहे की असा दावा करणाऱ्यांपासून सावध राहा. कारण असा दावा करणारे सायबर ठग असू शकतात. जे फंड काढण्याच्या नावाखाली आपली आयुष्यभराची कमाई स्वाहा करु शकतात. एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम आणि एपीवाय म्हणजे अटल पेंशन योजना अंतर्गत संपूर्ण फंड काढता येत नाही. नियमाप्रमाणे केवळ एकच हिस्सा काढता येतो.
सायबर ठग कधी थांबलेली पेन्शन मिळवून देण्याच्या नावाने तर कधी जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना ठकवत आहेत. वेळोवेळी सरकारी विभाग आणि बँकांच्या वतीने लोकांना यासंदर्भात सावधान केले जात आहे. तरीही सायबर ठकांविरोधात काही कारवाई झालेली नाही. सेंट्रेल पेन्शन अकाऊंटिंग ऑफीस म्हणजे सीपीएओने देखील आपल्या वेबसाईटवर स्पष्ट शब्दात सांगतले आहे की सायबर चाचे पेन्शनधारकांना त्याची जीवनप्रमाण-पत्र ऑनलाईन अपडेट करण्यास मदत करण्याच्या नावाखाली कॉल करत आहेत. आणि त्यांच्या पेन्शनवर डल्ला मारण्यासाठी नवनवीन आयुधांचा वापर करीत आहेत.
सायबर गुन्हेगार पीडितांकडून त्यांच्या वैयक्तिक माहिती उदाहरणार्थ पेन्शन पेमेंट आदेश क्रमांक, जन्मतारीख, बँकेचा तपशील, आधार क्रमांक आदी सादर करण्यास सांगतात. त्यानंतर पडताळणीसाठी वन टाईम पासवर्ड (OTP) पाठवण्याचा दावा करतात आणि पेन्शनधारकाला OTP शेअर करण्याची विनंती करतात. एकदा का तुम्ही तुमचा ओटीपी नंबर दिला की ते तुमच्या पेन्शन खात्यात शिरकाव करीत तुमचे अकाऊंट बेनामी बँक खात्यावर ट्रान्सफर करीत असतात.त्यानंतर ही रक्कम पेन्शनधारकांना पुन्हा कधीच मिळत नाही. त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या नंतर लक्षात येते.