AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Rate : ईपीएफ खातेधारकांसाठी खुशखबर, प्रोव्हीडंट फंडावर व्याजदर वाढणार?

EPFO Rate Update:चालू आर्थिक वर्षात ईपीएफओधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळेल असे मानले जाते. २०२४-२५ मध्ये, ईपीएफवर ८.२५ टक्के व्याज मिळाले होते. यंदाच्या आर्थिक वर्षातही याच प्रमाणात व्याजदर मिळण्याची शक्यता आहे.

EPFO Rate : ईपीएफ खातेधारकांसाठी खुशखबर, प्रोव्हीडंट फंडावर व्याजदर वाढणार?
| Updated on: Feb 13, 2025 | 4:25 PM
Share

होळीच्या आधा देशातील ७ कोटी ईपीएफ खातेधारकांना मोठा लाभ मिळू शकणार आहे. एम्प्लॉय प्रोव्हीडंट फंड ऑर्गनायझेशनचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे. ज्यात आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये ईपीएफवर ८.२५ टक्के व्याजावर मोहर लागण्याची शक्यता आहे याआधी आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये देखील एम्प्लॉय प्रोव्हीडंट फंडावर ८.२५ टक्के व्याज मिळाले होते.

एम्पलॉय प्राविडेंट फंड ऑर्गनायझेशनच्या इन्वेस्टमेंट फायनान्स आणि ऑडिट कमिटीची येत्या आठवड्यात बैठक होणार आहे. यात आर्थिक वर्षे २०२४-२५ च्या ईपीएफओच्या इन्कम आणि खर्च यावर विचार केला जाणार आहे.या बैठकीत एम्प्लॉयई प्रोव्हीडंट फंडावर किती व्याजाची निश्चिती होणार यावर निर्णय होणार आहे. यावर अखेरची मोहर श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत लागणार आहे.या बैठकीत व्याजदर निश्चित झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडे हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला जाणार आहे.

आर्थिक वर्षे २०२३-२४ साठी ईपीएफ खाताधारकांना८.२५  टक्के,२०२२-२३  मध्ये ८.१५ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.१० टक्के व्याज दर मिळाला होता. यंदाही ईपीएफओ धारकांना त्यांच्या गुंतवणूकीवर चांगला रिटर्न मिळणार असे म्हटले जात आहे.

यंदाही ईपीएफओधारकांना आपल्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळाला आहे. तर प्रोव्हीडंट फंड आणि क्लेम सेटलमेंट प्रकरणात देखील ईपीएफओ इतिहास रचला होता. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये एम्प्लॉई प्रोव्हीडंट फंड ऑर्गनायझेशनने ५ कोटीहून अधिक क्लेम सेटल केले असू हा एक रेकॉर्डच आहे. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये ईपीएफओने २,०५,९३२.४९ कोटी रुपयांचे ५.०८ कोटी क्लेम सेटल केले होते. तर आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये १,८२,८३८.२८ कोटी रुपयांचे ४.४५ कोटी क्लेम सेटल केले होते.

सात कोटी सदस्य

सध्या ईपीएफओचे सात कोटीहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत, संघटीत क्षेत्रात खास करुन खाजगी सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी ईपीएफओमध्ये जमलेला पैसा ही सर्वात मोठी सोशल सिक्युरिटी मानली जात आहे. खाजगी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला एक समान हप्ता पीएफ नावाने कापला जातो. कंपनीच्या वतीने देखील तितकाच हप्ता पीएफमध्ये जमा केला जातो. कर्मचारी नोकरी सोडल्याने. घर खरेदी किंवा घर बांधणे, लग्न, मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीनंतर पीएफचे पैसे काढू शकतो.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.