‘त्याचा’ काहीच दोष नव्हता, ‘तो’ फक्त पाणी प्यायला गेला, आणि…, नांदेड हादरलं!

नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाची काहीच चूक नव्हती. तो पाणी प्यायला एका हॉटेलमध्ये गेला. पण त्याच्यासोबत जे घडलं त्यामुळे संपूर्ण नांदेड शहर हादरलं आहे. या घटनेमुळे नांदेडच्या नागरिकांमध्येदेखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

त्याचा काहीच दोष नव्हता, तो फक्त पाणी प्यायला गेला, आणि..., नांदेड हादरलं!
| Updated on: Dec 29, 2023 | 7:45 PM

नांदेड | 29 डिसेंबर 2023 : नांदेड शहर एका हत्येच्या घटनेमुळे सुन्न झालं आहे. सर्वसामान्य नागरीक शहरात सुरक्षित आहेत की नाहीत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एका निरापराध, होतकरु तरुणाची क्षुल्लक कारणावरुन हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण शहारात याच घटनेची चर्चा सुरु आहे. आज एका तरुणासोबत हे घडलंय, उद्या दुसऱ्या कुणासोबत घडलं तर? अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही या घटनेची चर्चा होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. पोलिसांनी आरोपींना पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून करण्यात आलाय. नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तू माझ्याकडे का बघतोस? असं म्हणत 7 ते 8 जणांनी लाथा-बुक्क्या मारून तरुणाची हत्या केली. व्यंकटेश वल्लमवार असं या तरुणाचं नाव आहे. शहरातील वसंतराव नाईक चौकातील नागार्जुन हॉटेल समोर व्यंकटेश वल्लमवार या युवकाची पानटपरी आहे. ती बंद करून व्यंकटेश हा पाणी पिण्यासाठी हॉटेलात गेला. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली.

हेही वाचा | अक्कू यादव हत्याकांड | 200 ते 400 महिलांनी मिळून त्याला कोर्टात का संपवलं?

व्यकटेश वल्लमवार हॉटेलला पाणी प्यायला गेला त्यावेळी दारू पित बसलेल्या युवकांनी तू आमच्याकडे काय बघतोस? असं म्हणत व्यंकटेशला लाथा-बुक्क्या मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत व्यंकटेशचा जागीच मृत्यू झालाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिलीय.