यूट्यूबवर व्हिडीओ पाहिला म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

मुंबई : पत्नी व्हिडीओ पाहत असल्याने पतीने थेट तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला. पत्नीला वारंवार यूट्यूबवर व्हिडीओ न पाहण्याचे सांगूनही संधी मिळेल तेव्हा ती व्हिडीओ पाहात होती. तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते, असे पतीचे म्हणणे आहे. संबंधित घटना 10 एप्रिलला पहाटे अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात …

यूट्यूबवर व्हिडीओ पाहिला म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

मुंबई : पत्नी व्हिडीओ पाहत असल्याने पतीने थेट तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला. पत्नीला वारंवार यूट्यूबवर व्हिडीओ न पाहण्याचे सांगूनही संधी मिळेल तेव्हा ती व्हिडीओ पाहात होती. तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते, असे पतीचे म्हणणे आहे.

संबंधित घटना 10 एप्रिलला पहाटे अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात घडली. 30 वर्षीय चेतन चौगुले आपल्या घरात पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासोबत झोपले होते. पहाटे 4 वाजता आरोपी पती चेतनला जाग आली तेव्हाही त्याची पत्नी यूट्यूबवर व्हिडीओ पाहत होती. त्यामुळे चेतनला राग आला आणि त्याने व्हिडीओ पाहू नको असे सांगत आरडाओरड केली. मात्र, पत्नीने त्याचे म्हणणे न ऐकता व्हिडीओ पाहणे सुरुच ठेवले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. त्यातच पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर आरोपी पतीला जेव्हा पच्छाताप झाला, तेव्हा तो स्वतः एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, ‘आरती चौगुले (24) आणि चेतन चौगुले (30) यांचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना 2 वर्षांचा एक मुलगाही होता. चेतन चौगुले मागील काही महिन्यांपासून नोकरीची शोधाशोध करत होता. मात्र, अद्यापही त्याला नोकरी मिळालेली नव्हती. पोलिसांच्या चौकशीत चेतनने सांगितले, ‘पत्नी आरतीला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे घरातील कामात तिचे लक्ष नव्हते. ती रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्येच व्यस्त असायची. यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले. मात्र, पत्नी वारंवार मुलासह माहेरी जाण्याची धमकी द्यायची.’

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *