दादर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 9 मुलींची सुटका, एका आरोपीला अटक

दादरसारख्या पॉश परिसरातील स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा (Sex racket Dadar) पर्दाफाश करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार दादर परिसरातील प्रभादेवी येथे सुरु होता.

Sex racket Dadar, दादर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 9 मुलींची सुटका, एका आरोपीला अटक

मुंबई : दादरसारख्या पॉश परिसरातील स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा (Sex racket Dadar) पर्दाफाश करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार दादर परिसरातील प्रभादेवी येथे सुरु होता. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या स्पा सेंटरवर धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. सलीम शेख नावाच्या आरोपीला अटक केली असून नऊ मुलींची (Sex racket Dadar) सुटका करण्यात आली आहे.

दादरमधल्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक होरीझॉन या रहिवासी इमारतीमध्ये हे स्पा सेंटर सुरु होते. विशेष म्हणजे या सोसायटीत माजी पोलीस अधिकारी, राजकीय क्षेत्रातील लोक वास्तव्यास आहेत. स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळूनसुद्धा काहीच हाती लागले नव्हते. मात्र खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थविरोधी पथकाने या रहिवासी इमारतीमध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटरच्या नावाखाली चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

पोलिसांच्या खबऱ्याने काल (20 डिसेंबर) या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या स्पा सेंटरवर धाड टाकली. या धाडीत जवळपास साडे बारा हजार रुपयांची रक्कम जप्त केली. पिटा अॅक्टप्रमाणे या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्यात आली असून सर्व मुलींना शिवडी न्यायालयात आज हजर करण्यात आले. मुख्य आरोपी सलीम शेख त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *