ऑल इंडिया बार परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, परीक्षाही पुढे ढकलली, जाणून घ्या नव्या तारखा

ऑल इंडिया बार परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, परीक्षाही पुढे ढकलली, जाणून घ्या नव्या तारखा
प्रातिनिधिक फोटो.

बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE-XVI) पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा 25 एप्रिल 2021 ला आयोजित केली जाईल.

Yuvraj Jadhav

|

Feb 22, 2021 | 4:43 PM

नवी दिल्ली : बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE-XVI) पुढे ढकलली आहे. बार काऊन्सिल ऑफ इंडिआनं परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यासोबत अर्ज भरण्याच्या तारखा देखील वाढवल्या आहेत. ही परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार होती. आता ही परीक्षा 25 एप्रिल 2021 ला आयोजित केली जाईल. बार काऊन्सिल कडून घेतली जाणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज करण्यासही मुदतवाढ देण्यात आलीय. (AIBE exam date 2021 postponed by Bar Council of India)

(AIBE Exam Date 2021) अर्ज करण्याची मुदत वाढली

बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने याबाबत एक सूचना पत्र जारी केले आहे. AIBE Exam Date 2021 या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात 26 डिसेंबर 2020 पासून झाली आहे. जुन्या नोटीफिकेशन नुसार अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 फेब्रुवारी होता. मात्र, AIBE-XVI परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आलीय. विद्यार्थी या परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड 10 एप्रिल 2021 नंतर जारी केली जाणार आहेत. ही परीक्षा 25 एप्रिल 2021 होणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

ऑल इंडिया बार परीक्षेला (All India Bar Exam) ज्या उमेदवारांना बसायचे आहे. त्यांनी ऑल इंडिया बार परीक्षेची ऑफिशियल वेबसाइट allindiabarexamination.com ला भेट द्यावी. तिथे ओपन होणाऱ्या होम पेज वर Registration (AIBE-XVI) लिंक वर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करता येईल. मोबाइल नंबर आणि ईमेल आईडी वापरुन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशन के बाद ऑनलाइन अ‌ॅप्लिकेशन फॉर्म (AIBE Application Form) भरता येईल.

परीक्षेविषयी अधिक माहिती

भारतात लॉचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्याक आहे. लॉमध्ये पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते. ऑल इंडिया बार परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.

ऑल इंडिया बार परीक्षा XV (AIBE-XV) 24 जानेवारी, 2021 ला झाली होती. देशभरातील 52 शहरांमधील 140 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. त्यामध्ये 1,20,000 कायद्याचे पदवीधर सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या:

CTET answer key 2021: सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या डायरेक्ट लिंकवरुन करा डाऊनलोड

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

(AIBE exam date 2021 postponed by Bar Council of India)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें