AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. CBSE Photo Uploading for Practical exams

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: Feb 14, 2021 | 5:37 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं यंदा होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी मोठे बदल केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळं आलेल्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमळे नियमित वर्ग सुरु झाले नसल्यानं सीबीएसईनं दहावी बारावीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. तर, 1 मार्च पासून सुरु होणाऱ्या प्रात्याक्षिक परीक्षांसाठी नवीन नियम लागू करत आहे. सीबीएसईकडून याविषयी शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा सुरु आहे. ( CBSE Board exam photo uploading rules for practical examination)

विदयार्थ्यांचा ग्रुप फोटो सीबीएसईला पाठवावा लागणार

सीबीएसईनं यावर्षीच्या प्रात्याक्षिक परीक्षांसाठी नवीन व्यवस्था लागू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे फोटो सीबीएसईला पाठवावे लागणार आहेत. सीबीएसईच्या शाळांमध्ये प्रात्याक्षिक परीक्षा सुरु असताना मोबाईल अ‌ॅप आणि सॉफ्टवेअरद्वारे फोटो पाठवावे लागणार आहेत. यामध्ये वेळ आणि जिओ टॅगिंग करावं लागणार आहे.

नियम मोडल्यास कारवाई

सीबीएसईच्या नियमांनुसार साळांनी पाठवलेल्या फोटोंमध्ये अंतर्गत परीक्षक, बहिस्थ परीक्षकस पर्यवेक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण आवश्यक आहे. ज्या फोटोमध्ये नियमांचं पालन केले नसेल त्यावेळी शाळांच्या प्राचार्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 (CBSE Board examinations- 2021) ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्च रोजी होणार आहे. तर , लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होतील त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील. तर, CBSE परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबतची घोषणा केली

संबंधित बातम्या :

सीबीएसई Board Exam Dates 2021 | सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

( CBSE Board exam photo uploading rules for practical examination)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.