CBSE Board Exam Dates 2021 | सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

2021 मधील सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. (CBSE Exam Date 2021 News and Latest Updates)

CBSE Board Exam Dates 2021 | सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
प्रतिकात्मक फोटो

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा (CBSE Board Exam Dates) नववर्षाच्या पूर्वसंध्येला झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ (Ramesh Pokhriyal Nishank) ही घोषणा केली. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 (CBSE Board examinations- 2021) ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्च रोजी होणार आहे. तर , लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होतील त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील. तर, CBSE परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. (CBSE Class 10th 12th Board exam 2021 date time admit card announcement latest update)

CBSE च्या परीक्षेचे 10 वी आणि 12 वीचे सविस्तर वेळापत्रक लवकर वेबसाईटवर उपलब्ध होईल, असंही शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.  10 वी आणि 12 वीच्या अंतर्गत मूल्यमापनाला 1 मार्च पासून सुरुवात होणार आहे.

“प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, मी सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 च्या परीक्षांच्या तारखांची घोषणा आज संध्याकाळी 6 वाजता करणार आहे. लक्ष ठेवा” अशा आशयाचे ट्विट रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारख्यांच्या घोषणेमुळे अभ्यासावर जोर देता येणार आहे.

Dear students & parents!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करुन सीबीएसई आवश्यक ती काळजी घेईल. त्यासंबंधी सर्व तयारी सुरु आहे, अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांसोबत झालेल्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये दिली होती. (CBSE Class 10th 12th Board exam 2021 date time admit card announcement latest update)

ऑनलाईन नाही, प्रत्यक्ष परीक्षा होणार

दरवर्षी जानेवारी महिन्यात सीबीएसई बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा पार पडतात. तर फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होतात. 2021 मधील सीबीएसईच्या परीक्षा लेखी पद्धतीने होतील, ऑनलाईन नाही, असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आधीच स्पष्ट करण्यात आले होते.

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे, याला रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी दुजोरा दिला. परीक्षा फेब्रुवारीच्या आधी होणार नाहीत, अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च प्राधान्य

कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन तारखा ठरवण्यात आल्या आहेत. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्यास परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, विद्यार्थ्यांचे हित याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असंही पोखरियाल यांनी स्पष्ट केलं. परीक्षांच्या घोषणांनंतर सीबीएसई हॉलतिकीटांचे वितरण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

(CBSE Class 10th 12th Board exam 2021 date time admit card announcement latest update)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI