CBSE Class 10-12 TimeTable 2021 : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक कसं पाहाल?

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक उद्या म्हणजे 2 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. (CBSE Class 10-12 TimeTable 2021)

CBSE Class 10-12 TimeTable 2021 : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक कसं पाहाल?
प्रातिनिधीक फोटो

CBSE Board Class 10, Class 12 Exam Date Sheet 2021 : केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड(CBSE) च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे (CBSE Exam Schedule) वेळापत्रक उद्या म्हणजे 2 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चला होणार आहे. तर, लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होतील. त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यापूर्वीच केली होती. (CBSE Class 10-12 Board Date Sheet Time Table 2021)

येत्या एप्रिल महिन्यात सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचे हॉलतिकीट जारी केले जाण्याची शक्यता आहे. यंदा कोरोनामुळे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. तसेच यंदाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना 33 टक्के इंटरनल चाईजचे प्रश्न विचारले जाणार आहे.

CBSE Class 10, 12 Exam Date Sheet 2021: परीक्षाचे वेळापत्रक कसे पाहाल?

  • सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक पाहण्यासाठी cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर दहावी किंवा बारावी या वर्गाचा ऑप्शन निवडा.
  • हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला 10 वी किंवा 12 वीचे वेळापत्रक स्क्रीनवर पाहायला मिळेल.
  • हे वेळापत्रक डाऊनलोड करुन तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता.

दरम्यान सीबीएसई बोर्डाची परीक्षा कोरोनाची सर्व नियमावली पाळून आयोजित केली जाणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फेस मास्क वापरणे गरजेचे असणार आहे. यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 (CBSE Board examinations- 2021) ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्च रोजी होणार आहे. तर , लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होतील त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील. तर, CBSE परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबतची घोषणा केली.  (CBSE Class 10-12 Board Date Sheet Time Table 2021)

संबंधित बातम्या : 

सीबीएसई Board Exam Dates 2021 | सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

Published On - 6:59 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI