AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी रूग्णालयात भयंकर प्रकार, पेशंटला आयसीयूत उंदराने कुरतडले, दुपारी मृत्यू; मीरा भायंदर हादरलं

Mira Bhayander : मीरा भायंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा हात चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आले होते. आता या महिलेचा मृत्यू झाला आहे.

सरकारी रूग्णालयात भयंकर प्रकार, पेशंटला आयसीयूत उंदराने कुरतडले, दुपारी मृत्यू; मीरा भायंदर हादरलं
Rat bite women in ICUImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 16, 2026 | 6:57 PM
Share

केंद्र सरकार दरवर्षी आरोग्य क्षेत्रावर हजारो कोटींचा खर्च करते. सर्व सामान्य लोकांना स्वस्तात चांगले उपचार मिळावेत यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही रुग्णांचा चांगले उपचार मिळत नसल्याचे समोर आले आहे. कारण मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरा भायंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा हात चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आले होते. त्यामुळे रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र आता संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयसीयुतील महिलेचा हात उंदराने कुरतडला

मिरा-भाईंदर शहरातील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या रुग्णालयात 12 मार्चला एका 89 वर्षीय महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री या महिलेचा हात उंदराने कुरतडा होता. यामुळे आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

कोणत्याही रुग्णालयाच्या आयसीयू सारख्या विभागात सामान्य लोकांना प्रवेश दिला जात नाही, मात्र आयसीयूमध्ये उदरांनी उच्छाद मांडल्याचे समोर आले होते. आज सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक पेशंटला पहायला गेले असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला. त्यावेळी महिलेच्या हाताला जखम झाल्याचे आढळले होते. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांच्या रात्रभर ही बाब लक्षात आली नाही.

महिलेचा मृत्यू

यानंतर आता आज सायंकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे. दरम्यान, यापूर्वीही अशाच घटना समोर आल्या होत्या.

Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...