AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 विधेयकावर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी विधेयकातील तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 6:47 PM
Share

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक विधिमंडळात सादर केलेले आहे. या विधेयकावर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकाचा उद्देश, विधेयकातील तरतुदी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यावेळी हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या विधेयकाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. या विधेयकाच्या तरतुदीनुसार आता सक्तीचे धर्मांतर, इच्छेविरुद्ध धर्मांतर आढळून आले तर कठोर कारवाई केली जाणार आहे. सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि 5 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे. असे असतानाच आता सक्तीच्या धर्मांतरातून जन्माला आलेल्या बाळाचा कोणता धर्म असेल? असे विचारले जात होते. याबाबतची कायद्यातील तरतूद समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार “कायद्याचे उल्लंघन करून धर्मांतर केले तर त्यात सामील असलेली व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र असतील. अशा प्रकारचे धर्मांतर झालेले नाही असे मानले जाईल. बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न झालेले असेल तर त्याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मुलाचा धर्म नेमका काय असेल?

तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयांनुसार या कायद्यात तरतूद केलेली आहे. बेकायदेशीर धर्मांतराद्वारे केलेला विवाह रद्द असल्याचे घोषित केले जाईल. त्यातून जन्माला आलेला बालक हा आई ज्या पूर्वाश्रमीच्या धर्माची असेल तोच मुलाचा धर्म मानला जाईल. त्या मुलास वडिलांकडे उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र कायम असेल. तसेच संबंधित आई ही पोटगी मागू शकते. अशा प्रकरणांत बाळाचा ताबा हा आईकडे असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, ठाकरे गटानेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. या विधेयकात कोणत्याही एका धर्माला विरोध केलेला नाही. या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले. तसेच विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कायदेशीर आव्हान दिले जाऊ नये यासाठी भास्कर जाधव यांनी काही सूचनाही दिल्या आहेत.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...