Anti Paper Leak Law: पेपर लीक करणाऱ्यांचं आता काही खरं नाही; नव्या कायदा काय, दोषींना शिक्षा किती?
Anti Paper Leak Law: पेपरफुटीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात आणखी कठोर पावलं उचलली आहेत. अँटी पेपर लीक कायद्यानुसार दोषींना काय शिक्षा असेल, विद्यार्थ्यांचा यात काय फायदा होईल, ते जाणून घ्या..

देशभरातील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात आणखी कठोर पावलं उचलली आहेत. NEET-UG वादापासून ते विविध राज्यांमध्ये भरती परीक्षा रद्द करण्यापर्यंत देशात अखेर एक नवीन आणि कठोर पेपरफुटीविरोधी कायदा (परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणारं विधेयक) आला आहे. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. दरवर्षी देशभरातील लाखो तरुण-तरुणी वर्षानुवर्षे परीक्षेची तयारी करतात. पण जेव्हा ऐन परीक्षेच्या दिवशीच त्यांना अचानक कळतं की प्रश्नपत्रिका फुटली आहे, तेव्हा कोणाचाही संताप अनावर होणं स्वाभाविक आहे. हाच संताप गेल्या महिनाभरात जंतर-मंतरवर स्पष्टपणे दिसून आला. आता हा गैरप्रकार पूर्णपणे थांबवण्यासाठी मोदी सरकारने हा ऐतिहासिक कायदा आणला आहे. या कायद्यात असं काय विशेष आहे, दोषींना कसं पकडलं जाईल.. याविषयीचा संपूर्ण तपशील सोप्या आणि सरळ शब्दांत समजून घेऊयात.. हा कायदा कोणत्या परीक्षांना लागू होईल? हा कायदा देशातील सर्व प्रमुख केंद्रीय संस्थांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांना लागू होईल. यामध्ये प्रामुख्याने खालील परीक्षांचा समावेश आहे- ...