AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात लॉकडाऊन? भीक मागण्याची वेळ येताच मोठा निर्णय? आता फक्त 3 दिवस…

पाकिस्तानात वाढत्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी शहबाज शरीफ सरकार 'स्मार्ट लॉकडाऊन'चा निर्णय घेणार आहे. यामुळे आता सरकारी-खाजगी कार्यालये आणि बाजारपेठा आठवड्यातून केवळ चार दिवसच सुरू राहणार आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस सुट्टी असेल.

पाकिस्तानात लॉकडाऊन? भीक मागण्याची वेळ येताच मोठा निर्णय? आता फक्त 3 दिवस...
pakistan petrol pumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 10:09 PM
Share

जगातील असंख्य देशात केवळ चार दिवसच ऑफिसला जाण्याचं आणि तीन दिवस सुट्टी एन्जॉय करण्याचं कल्चर आहे. आपल्या शेजारच्या पाकिस्तानातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. केवळ आपली दिवाळखोरी लपवण्यासाठी पाकिस्तानने हे कल्चर आत्मसात करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याला ‘स्मार्ट लॉकडाऊन’ असं नाव दिलं आहे. शहबाज शरीफ यांचे सरकार केवळ ऑफिसेससाठी हा निर्णय घेणार नाही, तर बाजारांसाठीही हा निर्णय घेणार आहे. म्हणजे पाकिस्तानात आठवड्यातीन तीन दिवस ऑफिससह मार्केटही बंद राहणार आहेत. कर्मचाऱ्यांची प्रचंड काळजी म्हणून पाक सरकार या प्रस्तावावर विचार करत नाहीये, तर केवळ आणि केवळ पेट्रोल वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

वाढत्या पेट्रोलियम किमतीमुळे शहबाज शरीफ सरकारचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे इंधनाची बचत करण्यासाठीच स्मार्ट लॉकडाऊन करण्याचा पाकिस्तानमध्ये विचार सुरू आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाचे दिवस कमी केले जाणार आहेत. तर मार्केटही तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग झाली. त्यात पेट्रोलियम प्रोडक्ट्सच्या वाढत्या किंमतीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सरकार ‘पेट्रोलियम स्मार्ट लॉकडाउन’च्या पर्यायाचा विचार करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकर घेण्यात येणार आहे.

फक्त चार दिवस

समी टीव्हीच्या माहितीनुसार, सरकारसमोर असलेल्या प्रस्तावानुसार सरकारी आणि खासगी कार्यालये आठवड्यातून चार दिवस सुरू राहतील. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस सुट्टी राहणार आहे. लोकांनी प्रवास करू नये आणि इंधनाची बचत व्हावी हा यामागचा हेतू आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धती लागू करण्याचाही सरकारचा विचार आहे. म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना रोज ऑफिसला बोलावण्यापेक्षा गटागटाने ड्युटी लावण्यात येणार आहे.

बाराज फक्त तीन दिवस

केवळ सरकारी कार्यालयाच्या कामकाजाचे दिवस कमी करण्याचा सरकार विचार करत नाहीये, तर आठवड्यातून तीन दिवस बाजार बंद ठेवण्याचाही विचार सुरू आहे. तसेच दुकान आणि बाजारातील कामाचे तासही कमी केले जाणार आहेत. हा प्रस्ताव लागू झाल्यास पाकिस्तानी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे.

वाढत्या दराने त्रस्त

दरम्यान पाकिस्तानमध्ये पेट्रोलिय प्रोडक्ट्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या किमती वाढून 376 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. हाय स्पीड डिजेलची किमत 403 रुपये प्रति लिटरहून अधिक आहे. त्यामुळे इंधनाची बचत आणि वाढत्या आर्थिक संकटावर मात करण्याचं पाकिस्तानी सरकारसमोर मोठं आव्हान आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा