
देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच अभ्यासक्रमाची चर्चा सुरू आहे. त्यातच ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या महत्वाकांक्षी योजनेचा श्रीगणेशा झाला आहे. आधार कार्डप्रमाणेच Apaar Card हे देशातील विद्यार्थ्याची नवीन ओळख असेल. हा 12 अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बदलून टाकेल. इतकंच कशाला मुलांच्या करिअरसाठी, नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे. सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इंत्यभूत डाटा असेल. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल. त्यांच्या इतर कौशल्य, खेळातील प्राविण्य याची संपूर्ण माहिती असेल. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांचा सीव्ही (Curriculum Vitae) असेल. 30 कोटींहून अधिक अपार कार्ड Apaar Card हे विद्यार्थ्यांचे Aadhaar Card आहे. देशात आतापर्यंत...