AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA: सूर्यकुमार यादवची झुंजार अर्धशतकी खेळी,  विक्रमी यादीत मिळवलं स्थान

भारत आणि अमेरिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यात भारताची अक्षरश: पडझड झाली. सूर्यकुमार वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अमेरिकेने भारतीय फलंदाजांची वाट रोखली.

IND vs USA: सूर्यकुमार यादवची झुंजार अर्धशतकी खेळी,  विक्रमी यादीत मिळवलं स्थान
IND vs USA: सूर्यकुमार यादवची झुंजार अर्धशतकी खेळी,  विक्रमी यादीत मिळवलं स्थानImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 07, 2026 | 9:02 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ सामने आले आहेत. या सामन्यात भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या. या धावसंख्येत सूर्यकुमार यादवची खेळी महत्त्वाची ठरली. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने खिंड लढवली. कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. एकीकडे भारत 100 धावा करेल की नाही अशी स्थिती होती. अशा तणावपूर्ण स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला सावरलं. 12.4 षटकात 77 धावांवर टीम इंडियाचे 6 गडी तंबूत होते. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण सूर्यकुमार यादव मैदानात होता आणि त्याने धावसंख्येच्या बाबतीत टीम इंडियाची लाज राखली. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकाराच्या मदतीने नाबाद 84 धावांची खेळी केली. अमेरिकेला 161 धावांचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. कारण चेंडू थांबून बॅटवर येत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना फटकेबाजी करण्यास अडचण आली. पण अशा स्थितीतही सूर्यकुमार उभा राहिला आणि संघाला धावसंख्येच्या बाबतीत तारलं.

सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तसं पाहिलं तर सूर्याच्या स्ट्राईक रेटच्या तुलनेत त्याने जास्त चेंडू खेळला. पण खेळपट्टी पाहता त्याची खेळी ही सर्वोत्तम होती. त्याने अर्धशतक करण्यासाठी 7 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीला चौथा गिअर टाकला शेवटच्या काही षटकात झटपट धावा केल्या. टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा कर्णधार भूषविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादवने दुसरं स्थान पटकावलं आहे. त्याने नाबाद 84 धावांची खेळी केली. या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. त्याने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 88 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम असून त्याने भारताविरूद्ध नाबाद 68 धावा केल्या होत्या.

सूर्यकुमार यादवने या अर्धशतकी खेळीसह खास यादीत स्थान मिळवलं आहे. भारताकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा कारनामा केला होता. विराट कोहलीने एकदा आणि रोहित शर्माने चार वेळा अर्धशतक ठोकलं आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करणारा पहिला कर्णधार ठरला आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.