
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अपार कार्डच्या फायद्याचा परिघ वाढवला आहे. अपार कार्डधारक विद्यार्थ्यांना विमान तिकीटात घसघशीत सूट मिळणार आहे. आतापर्यं अपार कार्डच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनीना रेल्वे, बस, ग्रंथालयात सवलत मिळत होती. सरकारी योजनांध्ये अनेक सुविधा देण्यात येत होत्या. आता विमान सेवा पण यामध्ये समाविष्ट करण्या येईल. सर्व एअरलाईन्सशी त्यासंबंधीची बोलणी सुरु आहे. अधिकाधिक अपार कार्ड तयार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी अपार कार्ड दाखवून विमान प्रवासात सवलत मिळवू शकतील. देशभरात सध्या 31.56 कोटी विद्यार्थांच्ये अपार कार्ड तयार झाले आहेत.
‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र
‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या महत्वाकांक्षी योजनेतंर्गत आधार कार्डप्रमाणेच Apaar Card हे देशातील विद्यार्थ्याची नवीन ओळख असेल. हा 12 अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांची शैक्षणिकच नाही तर कौशल्य, खेळातील प्राविण्य याची संपूर्ण माहिती नोंदवले. मुलांच्या करिअरसाठी, नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे. सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इंत्यभूत डाटा असेल. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल.
अपार कार्डचे फायदे
रेल्वेच्या भाड्यात सवलत
ग्रंथालयात मुक्त प्रवेश
सरकारी योजनांमध्ये प्राथमिकता
रेल्वे, बस भाडे, सहलीसाठी विशेष सवलत
विमान प्रवासात मोठी सवलत
इतर ही अनेक सवलती देण्यात येतील
असे असेल अपार कार्ड
देशभरातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अपार कार्ड तयार होईल
विद्यार्थ्यांना 12 अंकांचे अपार कार्ड देण्यात येईल
त्यात विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचा आधार क्रमांकाची नोंद असेल
अपार कार्ड 12 अंकी कार्ड असेल. त्यात क्यूआर कोड असेल
या कार्डवर विद्यार्थ्यांचा फोटो असेल, तो ठराविक काळानंतर अपडेट होईल
APAAR ID कार्डचा फायदा काय?
विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्या शाळेत दाखला घेताना, देशातील कोणत्याही महाविद्यालयात, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपार कार्डचा डेटा वापरता येईल. अपार आयडी, अपार 12 अंकांच्या आधारे त्याचा प्रवेश निश्चित होईल. कागदपत्रांची झंझट संपेल.
विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्याचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. विद्यार्थ्यांचा त्यांच्या 12 अंकी क्रमांकाच्या आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.
अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य धरण्यात येईल.
अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालय, ग्रंथालयात मोफत प्रवेश मिळेल
सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोफत पुस्तकं आणि वह्यांचा पुरवठा करण्यात येईल. त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल.
विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपे होईल
यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार आयडी महत्त्वाचा असेल. त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल.
विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार कार्ड संलग्न असेल. विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यात जमा होईल. त्यांच्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे.
सरकारी विद्यार्थी वसतीगृहात आणि विविध खासगी वसतीगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपार कार्ड महत्त्वाचे असेल. त्याआधारे सवलत मिळेल.
देशभरात शाला शैक्षणिक सहली आयोजन करतात. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर होईल.
विद्यार्थ्यांची संख्या, विविध अभ्यासक्रमातील जागा, व्यावसायिक अभ्यासक्रमातील जागा या सर्वांची गोळाबेरीज करणे आणि नोकरीची, रोजगाराची उपलब्धता यांची सांगड घालता येईल. त्याआधारे नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.