कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात, शाळा सुरु करण्याचं धाडस करण्यापूर्वी विचार करावा: बच्चू कडू

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. Bacchu Kadu

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात, शाळा सुरु करण्याचं धाडस करण्यापूर्वी विचार करावा: बच्चू कडू
बच्चू कडू, राज्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 10:45 AM

अमरावती: शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. (Bacchu Kadu said students health is important in Corona)

कोरोनामुक्त गाव कोरोनाग्रस्त होऊ शकते

कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. आता शाळा कशा सुरू होणार व केव्हा सुरू होणार ही प्रतीक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे.शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केलंय. जे गाव कोरोना मुक्त तेथे शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, मात्र कोरोना मुक्त गाव जरी असलं तरी ते गाव कोरोना ग्रस्त होऊ शकते त्यामुळे त्याची भीती आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

माणूस महत्वाचा आरोग्य महत्वाचं

बच्चू कडू यांनी कोरोना संकटाच्या काळात माणूस महत्वाचा आहे,आरोग्य महत्त्वाचे आहे. शिक्षण कशा पद्धतीने सुरू करता येईल हा सर्वांसमोर प्रश्न आहे. मात्र, शाळा सुरू करताना मोठं धाडस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.

शिक्षण आजचं उद्या घेता येईल

कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. शिक्षण आजचं उद्या घेता येईल, मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्वाचं आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याची शक्यता तपासण्याचे आदेश

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10/12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी दिले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

(Bacchu Kadu said students health is important in Corona)