पेपर फोडणं आता महागात पडणार, 1 कोटीचा दंड आणि इतक्या वर्षाचा तुरुंगवास; लोकसभेत विधेयक सादर

Public Examination Bill 2024 : पेपर फोडणे आता महागात पडणार आहे. थेट मोठी कारवाई केली जाईल. नुकताच लोकसभेत पेपर फुटी विरोधात एक विधेयक मांडण्यात आलंय. आता यामुळे अनेक संस्थांचे धाबे दणाणले आहेत. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना आता थेट तुरुंग भोगावा लागणार आहे. 1 कोटींचा दंडही भरावा लागेल.

पेपर फोडणं आता महागात पडणार, 1 कोटीचा दंड आणि इतक्या वर्षाचा तुरुंगवास; लोकसभेत विधेयक सादर
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 2:52 PM

मुंबई : पेपर फुटीबद्दल आता अत्यंत मोठा निर्णय हा शासनाकडून घेण्यात आलाय. हेच नाही तर लोकसभेत पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आलंय. आता पेपर फुटीसंदर्भात कठोर कारवाई ही केली जाणार आहे. फक्त दंडच नाही तर पेपर फुटी केल्यावर थेट शिक्षा देखील भोगावी लागणार आहे. या विधेयकानुसार साधा दंड नसून पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल 1 कोटी रूपयांचा दंड हा भरावा लागणार आहे. पेपर फुटीच नव्हे तर परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या जागी जर दुसऱ्या कोणी परीक्षा देत असेल तर त्याच्याविरोधात देखील कठोर कारवाई ही केली जाणार आहे.

लोकसभेत 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा पेपर फुटीचा विधेयक मांडण्यात आलाय. हा विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडला आहे. जर एखादा व्यक्ती हा पेपर फुटीमध्ये दोघी आढळला तर त्याला तब्बल 10 वर्षांची जेल होणार आहे आणि 1 कोटी रूपये दंड भरावा लागणार. पेपर फुटीसंदर्भात कठोर भूमिका घेताना केंद्र शासन दिसत आहे.

फक्त हेच नाही तर पेपर फुटीमध्ये एखादी संस्था सहभागी असेल तर त्या संस्थेला परत परीक्षा घेण्याचा सर्व खर्च हा उचलावा लागेल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. म्हणजेच काय तर पेपर फुटीमध्ये शाळेचा किंवा महाविद्यालयाचा सहभाग आढळून आला तर कठोर कारवाईला संस्थेला सामोरे जावे लागेल.

पेपर फुटीमुळे जर परीक्षा रद्द झाली तर रद्द झालेल्या परीक्षेचा संपूर्ण खर्च हा त्या संस्थेला करावा लागेल. संबंधित संस्थेची मालमत्ता देखील जप्त केली जाईल. नेहमीच पेपर फुटीच्या बातम्या या ऐकायला मिळतात. पेपर फुटीमध्ये परत परीक्षा घ्यावी लागते. पेपर फुटीमुळे राज्य सरकारचा मोठा खर्च होतो. पेपर फुटी प्रकरणात आता मोठे पाऊल उचलण्यात आलंय.

राष्ट्रपतींनी पेपर फुटी प्रकरणात त्यांच्या भाषणात चिंता व्यक्त केली. पेपर फुटीमुळे उमेदवारांना देखील मोठा त्रास हा सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे पेपर फुटी प्रकरणातील तपास हा पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त या दर्जाचे अधिकारी करणार. तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवण्याचा अधिकार सरकारला असेल. यामुळे आता परीक्षा पद्धत पारदर्शक होणार हे स्पष्ट आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.