CBSE 10th Results 2022: प्रतीक्षा संपणार! सीबीएसई दहावीचा रिझल्ट लवकरच लागणार! प्रवेशपत्र काढून ठेवा, रोल नंबर पाठ करा, जन्मतारीख विसरू नका

| Updated on: Jul 03, 2022 | 3:28 PM

CBSE 10th Results 2022 updates in marathi: सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थी आणि शाळांना सात महिन्यांच्या सलग परीक्षेच्या वेळापत्रक दिले, ज्यात दोन बोर्ड, दोन प्री-बोर्ड आणि प्रॅक्टिकल्सचा समावेश आहे.

CBSE 10th Results 2022: प्रतीक्षा संपणार! सीबीएसई दहावीचा रिझल्ट लवकरच लागणार! प्रवेशपत्र काढून ठेवा, रोल नंबर पाठ करा, जन्मतारीख विसरू नका
CBSE 10th Results 2022
Image Credit source: Social Media
Follow us on

CBSE 10th Results 2022: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. उद्या म्हणजेच ४ जुलैला दहावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो.आज या संदर्भातली घोषणा होऊ शकते. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाकडून सीबीएसई दहावीचा निकाल 4 जुलैच्या आसपास आणि बारावीचा निकाल 10 जुलै 2022च्या (CBSE 10th Results 2022) आसपास जाहीर होण्याची शक्यता होती. बऱ्याच शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल (CBSE 12th Results 2022) जाहीर केला असला तरी भारत आणि परदेशातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई निकालाच्या विलंबामुळे फटका बसलाय. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थी आणि शाळांना सात महिन्यांच्या सलग परीक्षेच्या वेळापत्रक दिले, ज्यात दोन बोर्ड, दोन प्री-बोर्ड आणि प्रॅक्टिकल्सचा समावेश आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टर्म-1 मध्ये विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. त्यानंतर सीबीएसईला निकाल जाहीर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला.

 निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल

CBSE 10th Term 2 चा निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) 04 जुलै 2022 रोजी दहावी (मॅट्रिक) टर्म बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. सीबीएसईचे अधिकारी आज कधीही दहावी निकाल 2022 च्या रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. यावर्षी टर्म 1 आणि टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in जाहीर केला जाईल. बोर्ड प्रथम दहावीचा निकाल जाहीर करेल (सीबीएसई दहावीचा निकाल 2022). यानंतर 12 वीचा (सीबीएसई 12 वी निकाल 2022) निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई 4 जुलै 2022 रोजी दहावीचा 2 किंवा अंतिम निकाल (सीबीएसई फायनल रिझल्ट 2022) जारी करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बारावीचा निकाल 10 जुलै किंवा त्यानंतर जाहीर होऊ शकतो. मात्र सीबीएसईकडून दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बोर्डाने निकालाच्या तारखेचा आधीचा पॅटर्न पाहिला तर सीबीएसई निकाल जाहीर होण्याच्या दोन-तीन तास आधी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करते.

हे सुद्धा वाचा

कसा पाहणार निकाल

  • विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
  • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा.

सीबीएसई 10 वी 2022 डिजिलॉकर ॲपद्वारे

  • डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर digilocker.gov.in जा.
  • तुमच्या आधार कार्ड नंबरच्या मदतीने नोंदणी करा.
  • क्रेडेन्शियल्सच्या मदतीने डिजिलॉकर खात्यात लॉग इन करा.
  • ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’वर क्लिक करा.
  • आता ‘सीबीएसई 10 वी रिझल्ट 2022’ किंवा ‘सीबीएसई 12 वी रिझल्ट 2022’ पास सर्टिफिकेट निवडा.
  • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर ओपन होईल, डाऊनलोड करण्यासाठी लॉग इन करा.
  • ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.

तुम्ही या वेबसाइट्सवर पाहू शकता निकाल

  1. cbseresults.nic.in
  2. cbse.nic.in
  3. cbse.gov.in
  • सर्वात आधी सीबीएसई cbse.gov.in किंवा cbresults.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर ‘सीबीएसई रिझल्ट 2022 दहावी टर्म 2’ (लवकरच ॲक्टिव्हेट होईल) या लिंकवर क्लिक करा.
  • आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करून लॉग इन करा.
  • सीबीएसई 10 वी टर्म 2 निकाल 2022 स्क्रीनवर उघडला जाईल.
  • ते तपासा आणि डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील.