CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल..

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसईकडून नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते. अखेर आज हा निकाल जाहीर करण्यात आला.

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल..
CBSE 12th Result
| Updated on: May 13, 2026 | 2:19 PM

सीबीएसई इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर हा निकाल लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागला. मात्र, सीबीएसईच्या निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी होते. विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइट्सवर आपला निकाल सहजपणे चेक करू शकतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकरिता बोर्डाने ऑनलाईन गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध केली. सीबीएसई बोर्डाने ऑनलाईन हा निकाल जारी केला.

विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्याकरिता आपला परीक्षेचा क्रमांक, शाळेचा कोड आणि प्रवेशपत्रावरील आयडी याबद्दल माहिती भरावी लागणार आहे. निकाल ऑनलाइन जाहीर होत आहे. किती टक्के पडले, कोणत्या विषयात किती मार्क पडले, याबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज नाही. विद्यार्थी घरी बसून आपला निकाल आरामात तपासू शकतात.

विद्यार्थी या निकालाच्या डिजीकॉकरच्या माध्यमातून गुणपपत्रिकाही डाऊनलोड करू शकतात. याकरिता विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर डिजीलॉकर या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे जा आणि लॉक उघडा. त्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा आधारने लॉग इन करा.  CBSE विभागात जाऊन CBSE इयत्ता 12वी निकाल 2026 हा पर्याय निवडा. तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.

Follow Us