
सीयूईटी पीजी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्टग्रॅज्युएट! नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून सीयूईटी पीजी चा निकाल जाहीर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आलाय. सीयूईटी स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. विद्यार्थी त्यांच्या परीक्षा रोल नंबर आणि जन्मतारखेद्वारे त्यांचे सीयूईटी पीजी स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
एनटीएने सीयूईटी पीजी 2022 चा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी देखील जाहीर केलीये. या परीक्षेत असणाऱ्या विद्यापीठांकडून त्यांची स्वतःची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात येणारे.
विद्यापीठाचं वैयक्तिक समुपदेशन असणारे. सीयूईटी पीजी 2022 स्कोअरकार्डच्या आधारे, सर्व केंद्रीय विद्यापीठे त्यांच्या वैयक्तिक समुपदेशनाबद्दल निर्णय घेतील.
CUET PG Result 2022 स्कोअरकार्ड कसं डाउनलोड करणार
सीयूईटी पीजी 2022 परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशभरातील 40 केंद्रीय विद्यापीठे आणि इतर राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
प्रश्नपत्रिकेच्या भाग 1 म्हणजेच जनरल पेपर (25 प्रश्न) आणि भाग 2 मीनिंग डोमेन नॉलेज (75 प्रश्न) साठी स्वतंत्र गुणांच्या आधारे सीयूईटी पीजी 2022 चे स्कोअरकार्ड तयार करण्यात आले आहे.