AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : अक्षर पटेल याचा कर्णधारपदावरुन पत्ता कट; केएल राहुल दिल्ली कॅपिट्ल्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार!

IPL 2026 Delhi Capitals Captain : मिनी ऑक्शन पार पडल्यानंतर आता दिल्ली कॅपिट्ल्स एक्शन मोडमध्ये आली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स अक्षर पटेल याला कर्णधारपदावरुन हटवणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

IPL 2026 : अक्षर पटेल याचा कर्णधारपदावरुन पत्ता कट; केएल राहुल दिल्ली कॅपिट्ल्सच्या नेतृत्वाची धुरा  सांभाळणार!
Axar Patel and Hardik Pandya IPLImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 22, 2025 | 8:58 PM
Share

आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) अवघ्या काही दिवसांपूर्वी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमधून एकूण 10 फ्रँचायजींनी गरजेनुसार एकूण 77 खेळाडूंची निवड केली. कॅमरुन ग्रीन मिनी ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर अनकॅप्ड खेळाडूही मालामाल झाले. या मिनी ऑक्शनमध्ये अनकॅप्ड खेळाडूंना चांगलाच भाव मिळाला. आता क्रिकेट चाहत्यांना आणि खेळाडूंना या 19 व्या मोसमाला केव्हापासून सुरुवात होणार? याचे वेध लागले आहेत. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून 19 व्या मोसमाला सुरुवात होऊ शकते. त्याआधी फ्रँचायजाीने ऑलराउंडरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्याचं म्हटलं जात आहे.

दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिट्ल्सने ऑलराउंडर अक्षर पटेल याला कर्णधारपदावरुन हटवलं आहे. अक्षरने गेल्या हंगामात (IPL 2025) दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. मात्र आता मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षर खेळाडूच्या भूमिकेत असणार आहे. तसेच आता केएलच्या जागी दिल्लीची धुरा कुणाला देण्यात येणार? अशीही चर्चा पाहायला मिळत आहे. कर्णधारपदासाठी एका नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

केएल राहुल याला नेतृत्वाची जबाबदारी?

अक्षर पटेल याच्यानंतर केएल राहुल याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. केएलला आयपीएलमध्ये नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. केएलने पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे केएल नेतृत्वासाठी प्रबळ दावेदार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

दिल्ली कॅपिट्ल्सची सूचक पोस्ट

तसेच दिल्ली कॅपिट्ल्सने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन व्हीडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे फ्रँचायजीकडून लवकरच काही तरी मोठी घोषणा करण्यात येणार आहे. अशात दिल्लीकडून नव्या कर्णधाराचं नाव जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कॅप्टन अक्षर पटेल याची कामगिरी कशी?

कॅप्टन अक्षर पटेल गेल्या हंगामात त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सा प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला. दिल्लीचं साखळी फेरीतच पॅकअप झालं. केएलच्या नेतृत्वात दिल्लीने 14 पैकी 7 सामने जिंकले. केएलच्या नेतृत्वात दिल्लीला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं.

अक्षर पटेलची आयपीएल कारकीर्द

दरम्यान अक्षर आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 162 सामने खेळला आहे. अक्षरने त्यापैकी 124 डावांत 3 अर्धशतकांसह 1 हजार 916 धावा केल्या आहेत. तसेच अक्षरने 159 डावांत 128 विकेट्स मिळवल्या आहेत.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.