आधी जगाला लावले दारूचे वेड, आता या देशातील लोकांनी दारूकडे फिरवली पाठ, कारण काय?
Alcohol : एक असा देश आहे ज्याने जगाला दारूचे वेड लावले त्या देशातील दारूची लोकप्रियता कमी झालेली आहे. गेल्या काही काळापासून या देशातील दारूचा खपही कमी झाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

जगभरात मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. आता मुस्लिम देश सौदी अरेबियामध्येही दारूची दुकाने पुन्हा उघडण्यात आली आहेत. कारण लोकांना काही विशिष्ट अटींसह दारू पिण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र एक असा देश आहे ज्याने जगाला दारूचे वेड लावले त्या देशातील दारूची लोकप्रियता कमी झालेली आहे. गेल्या काही काळापासून या देशातील दारूचा खपही कमी झाला आहे. हा देश कोणता आहे? यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ब्रिटन हा असा देश आहे ज्या देशाने जगातील देशांना दारूचे व्यसन लावले. मात्र आता या देशातील लोक दारूपासून दूर जाऊ लागले आहेत. द गार्डियनमधील 219 च्या एका अहवालानुसार द ग्लोबल ड्रग सर्व्हेने सांगितले की, ब्रिटनमधील लोक जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त दारू पित होते. 36 देशांच्या डेटाच्या आधारे, ब्रिटनमधील लोक दरवर्षी सरासरी 51.1 वेळा दारू पीत होते. याचाच अर्थ आठवड्यातून एकदा दारू पीत होते. मात्र आता हा आकडा घटला आहे.
ब्रिटनमध्ये दारू पिण्याचे प्रमाण घटले
समोर आलेल्या माहितीनुसार, या देशात दारूचा वापर विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. युनायटेड किंग्डमचा ऐतिहासिकदृष्ट्या अल्कोहोलशी संबंध आहे. या देशातील बिअर आणि वाइन बनवण्याच्या परंपरेचा चांगला इतिहास आहे, मात्र असं असलं तरी या देशातील दारूचे सेवन घटले आहे. ब्रिटनमध्ये ख्रिसमसच्या काळाच मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते, मात्र आता यात मोठी घट झाली आहे.
ब्रिटनमधील लोक आता किती दारू पितात?
IWSR संशोधन कंपनीने एक आकडे वारी जाहीर केली आहे. यानुसार गेल्या वर्षी ब्रिटनमधील प्रौढ व्यक्ती आठवड्यातून 10.2 ड्रिंक्स पितात. 1990 नंतरची हा सर्वात कमी आकडा आहे. दोन दशकांपूर्वी लोक आठवड्यातून सरासरी 14 ड्रिंक्स पितात. हा आकडा कमी आहे.
लोक कमी दारू का पितात?
तज्ञांच्या मते आर्थिक दबाव, आरोग्याबद्दल वाढती चिंता आणि वृद्धत्वाकडे चाललेली लोकसंख्या ही यामागील प्रमुख कारणे आहेत. बदलाची प्रमुख कारणे आहेत. लोकांनी पूर्णपणे दारू सोडलेली नाही, मात्र ते पूर्वीपेक्षा कमी सेवन करत आहेत. याबाबत बोलताना IWSR चे अध्यक्ष मार्टेन लोडेविजक्स यांनी फायनान्शियल टाईम्सला सांगितले की, ब्रिटनची लोकसंख्या वृद्ध होत आहे, त्यामुळे लोक वयानुसार कमी मद्यपान करत आहेत.
पुढे बोलताना लोडेविजक्स म्हणाले की, आरोग्याबाबत जागरूकता वाढत आहे,महागाई वाढली आहे, त्यामुळे लोक बाहेर जाऊन जास्त मद्यपान करत नाहीयेत. वाढत्या अल्कोहोलच्या किमती आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता वाढली आहे. काही लोक कमी मद्यपान करत आहेत किंवा पूर्णपणे दारू सोडत आहेत. गेल्या 5 वर्षांत दारूचे सेवन 20 टक्क्यांनी कमी झाले आहे.
