‘माझ्या विमानासमोर युएफओ उडत आहे, ‘ तीन हजार फूटांवरुन पायलटने पाठवला एटीसीला संदेश
एका पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) यांच्यातील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग सध्या चर्चेत आहे. त्यामध्ये, पायलट आणि एअर ट्रॅफीक कंट्रोलर एका यूएफओवर चर्चा करताना ऐकू येत आहेत.

अमेरिकेच्या रोड आयलँडच्या अवकाशात एक विचित्र वस्तू पायलटला दिसली… या घटनेची माहिती या पायलटने एटीसीला दिली . याचे कॉल रेकॉर्डिंग आता समोर आले आहे. यात एक पायलट एअर ट्रॅफीक कंट्रोलला युएफओ दिसल्याचे सांगताना दिसत आहे. पायलट एटीसीला त्याच्या विमानासमोर चांदी सारखा चमकणारा एखादा डब्बा असावा अशी वस्तू दिसल्याचे सांगताना दिसत आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार एअर ट्रॅफीक कंट्रोलच्या कॉलवर पायलटने आपल्या विमानासमोर काही फूट अंतरावर चांदीच्या डब्ब्यासारखी युएफओ पाहिल्याची सूचना दिल्याचे ऐकायला येत आहे.
पायलटचा विमानाजवळ रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा
अलिकडे समोर आलेल्या लाईव्ह एटीसी प्रसारणाच्या व्हिडीओ हे क्षण कैद झाले आहेत. जेव्हा पायलटने ग्राऊंड टीमला सांगितले की असे वाटते की कोणती रहस्यमय वस्तू त्याच्या प्लेनच्या समोर काही अंतरावर तरंगत आहे. पायलटने त्याची तुलना चांदीच्या डब्याशी केली आहे. कदाचित ती यूएफओ असू शकते.
पायलटने सांगितले की असे वाटत आहे की कोणती तरी अजब वस्तू आमच्या जवळून गेली. एक छोटासा चांदीचा डब्बा. तो एटीसीला विचारतो की तुम्हाला माहिती आहे का हे काय असू शकते? एटीसीने या संदर्भात या क्षेत्रात अशी कोणतीही अन्य वस्तू उडण्याचा रिपोर्ट नाही असे म्हटले आहे. एटीसीने पायलटला विचारले की ती वस्तू ड्रोन वा फुगा असू शकतो.
पायलटचा युएफओ असल्याचा दावा
हे रेकॉर्डिंग VASAviation चॅनलद्वारे YouTube वर शेअर करण्यात आले होते. जे नियमित एटीसी फ्रीक्वेंसीच्या बातम्या पोस्ट करते. एटीसीने या संदर्भात स्पष्ट केल्यानंतरही त्यांना माहीती नव्हते की ती वस्तू काय होती. अधिक माहिती मागितल्यावर पायलटने उत्तर दिले की युएफओ हवेत त्याच्या विमानाच्या काही फूट अंतरावर होती.
पाच प्रवाशांची क्षमता असलेले पायपर PA-32RT-300T टर्बो लान्स II विमान उडवताना पायलटने सांगितले की सुमारे 3,500 फूट उंचावर मी आहे. तो आमच्या विंगटीपच्या एकदम शेजारुन गेला. एक छोटा चांदीचा डब्बा होता. पायलटचे म्हणणे होते की तो फुगा नव्हता.
या भागातील अन्य पायलटनी देखील रेडिओवर आपली प्रतिक्रीया दिली. ज्यात एकाने म्हटले की मला त्या वस्तूवर विश्वास आहे. असे खरोखरच घडू शकते. यावर एटीसीने सांगितले की हे घाबरवणारे आहे. ग्राऊंड टीमने छोट्या व्हिडीओमधून उत्तर दिले. ज्यानंतर अन्य एटीसी ऑपरेटीव्हने सांगितले की एलियन्सशी भिडण्यासाठी शुभेच्छा.
