Baba Venga Prediction : 2026 मध्ये काय काय घडणार? बाबा वेंगांचं भयंकर भाकीत, जगभरात खळबळ
लवकरच 2026 नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षांत काय -काय घटणा घडणार? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते, आता या संदर्भात बाबा वेंगा यांचं भाकीत समोर आलं आहे, या भाकीतानं खळबळ उडाली आहे.

2025 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच आपण 2026 मध्ये पर्दापण करणार आहोत. सर्व जन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान नवं वर्ष जगासाठी कसं असणार? नव्या वर्षात काय -काय घडणार? या संदर्भात आता बाबा वेंगा यांची नवी भविष्यवाणी समोर आली आहे. बाबा वेंगा यांच्या नव्या भाकीतामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जेव्हा -जेव्हा जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्याची चर्चा होते त्यामध्ये सर्वात आधी बाबा वेंगा यांचं नाव घेतलं जातं. बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला होता, तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला, त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील पाच हजार वर्षांची भाकीतं करून ठेवली आहेत, बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो.
बाबा वेंगा यांच्याबद्दल असं देखील बोललं जातं की, त्यांच्या लहानपणी त्या एका वादळात सापडल्या होत्या, या वादळामुळे त्यांनी आपले दोन्ही डोळे गमावले, त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, बाबा वेंगा यांनी त्यानंतर पुढील पाच हजार वर्षांचं भाकीत सांगितलं. त्यांच्या प्रसिद्ध भाकितांमध्ये हिटरलचा मृत्यू, ब्रिटनच्या रानीचा मृत्यू , जपानची त्सुनामी, अमेरिकेवरील हल्ला या भाकीतांचा समावेश आहे. दरम्यान 2025 संदर्भात देखील त्यांनी अनेक भाकीत केली होती, त्यातील अनेक खरी ठरल्याचं मानलं जातं, जसं की त्सुनामी, भूकंप, अतिवृष्टी.
दरम्यान आता बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात देखील काही भाकीत केली आहे, 2026 मध्ये जगावर मोठं आर्थिक संकट येईल, जगातील अनेक देश या आर्थिक संकटाखाली दबून जातील, अनेक देशांची चलनं उद्ध्वस्त होतील, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जाणकरांच्या मते जर बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं ठरलं तर नव्या वर्षात जागतिक मंदी येऊ शकते. काही देशांच्या चलनाचे मूल्य वाढेल तर काही देशांचे चलनामध्ये प्रचंड घसरण होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
