जगातल्या सर्वात ताकदवान मुस्लीम देशाचा निर्णय, आता या निवडक लोकांनाच विकणार दारु
जगातील सर्वात ताकदवान मुस्लीम देशाने आता बदलत्या आर्थिक आणि व्यापारी संबंधांसाठी काही ठराविक श्रेणीच्या लोकांसाठी मद्यविक्रीची सोय केली आहे.

मुस्लीम धर्मात दारु निषिद्ध मानली जाते. परंतू जगातील सर्वात ताकदवान मुस्लीम देश सौदी अरबने आपल्या मद्याच्या धोरणात बदल केला आहे. या देशान कोणतीही औपचारिक घोषणेशिवाय एकमेव मद्याचे स्टोअरचे नियम बदललेले आहेत. आधी हे स्टोअर केवळ गैर-मुस्लीम डिप्लोमॅट अधिकारी यांनाच मद्याची विक्री करायचे. आता हे प्रिमीयम रेसिडेन्सी परमिटवाले आणि परदेशी नागरिकांना खुले करण्यात आले आहे.
रियाद येथील डिप्लोमॅटीक क्वार्टरमध्ये स्थित हे स्टोअर कोणत्याही साईनबोर्ड शिवाय एक सामान्य इमारत आहे. परंतू या स्टोअर असलेल्या इमारतीच्या बाहेर कारची आणि लोकांनी मोठी रांग असते. हे स्टोअर सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये केवळ गैर मुस्लीम डिप्लोमॅट अधिकाऱ्यांसाठी खुले होते. आता नव्या नियमांनुसार प्रीमियम रेसिडेन्सी परमिटवाले परदेशी लोकही येथे दारु विकत घेऊ शकतात. हे परमिट सर्वसाधारणपणे खूपच कुशल अधिकारी, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना दिले जाते.
दारुवरील निर्बंध
सौदी अरबमध्ये 1950 च्या दशकाच्या सुरुवातीपासून मद्यावर संपूर्णपणे निर्बंध होते. त्यामुळे या स्टोअरला नियंत्रित आणि मर्यादित मद्यविक्रीचा एक प्रयोग म्हणून पाहिले जात आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरबमध्ये अलिकडे महत्वाचे सामाजिक आणि आर्थिक बदल झाले आहेत. ज्याचा हेतू पर्यटनाला प्रोत्साहन देणे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि तेलावर अवलंबित्व कमी करणे महत्वाचे आहे.
सौदीत उघडले सिनेमाघर
याच बदललेल्या धोरणामुळे सौदीत सिनेमाघर उघडले, महिलांना ड्रायव्हींग लायसन्स दिले गेले आणि मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले. परंतू राजकीय असहमती आणि सरकारवर टीका करणाऱ्यांवर आताही कठोर कायदा आणि कडक शिक्षेची तरतूद आहे. मात्र सर्वसामान्य सौदी नागरिकांवर मद्यपानास संपूर्णपणे बंदी लागू आहे. हे स्टोअर केवळ एक मर्यादित समुहासाठी उघडे आहे. येथे सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. प्रवेशाआधी पात्रतेची तपासणी केली जाते,झडती केली जाते. आत फोन आणि कॅमेरे नेण्यास मनाई आहे. एवढेच काय स्मार्टचष्म्याचीही तपासणी केली जाते.
