NEET UG 2022 : चला नोंदणीची तारीख पुढे ढकलण्यात आलीये राहिलेल्यांनी नोंदणी करून घ्या ! खाली लिंक दिलेली आहे

| Updated on: May 16, 2022 | 2:20 PM

या परीक्षेसाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर तुम्ही लगेच नीट neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. यावेळी एनईईटी यूजी 17 जुलै 2022 रोजी होणार आहे.

NEET UG 2022 : चला नोंदणीची तारीख पुढे ढकलण्यात आलीये राहिलेल्यांनी नोंदणी करून घ्या ! खाली लिंक दिलेली आहे
NEET UG 2022 : नोंदणी करून घ्या !
Image Credit source: facebook
Follow us on

देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही तारीख 15 मे वरून 20 मे 2022 करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर तुम्ही लगेच नीट neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. यावेळी एनईईटी यूजी 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. यापूर्वी, एनईईटी यूजीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 6 मे होती, जी 15 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच तारीख 20 मे २०२२ रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरण्याची मुदत 20 मे 2022 च्या रात्री 11.50 पर्यंत आहे. देशातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

एनईईटी यूजी 2022 साठी नोंदणी कशी करावी

  1. सर्वप्रथम उमेदवारांना neet.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
  2. वेबसाइटच्या होम पेजवर त्यांना एनईईटी यूजी 2022 च्या नोंदणीची लिंक मिळेल, ज्यावर क्लिक करावे लागेल.
  3. आता तुमच्यासमोर नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर तुम्ही तपशील टाका. यानंतर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  4. आता तुमच्या क्रेडेन्शियल्समधून लॉग इन करा आणि नंतर अर्ज भरा. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. शेवटी अर्ज शुल्क जमा करा आणि फॉर्म फायनल सबमिट करा. त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.

तर एनईईटी यूजी 2022 चे अर्ज शुल्क आहे

एनईईटी यूजीसाठी अर्ज करणार् या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1600 रुपये शुल्क भरावे लागेल. ईडब्ल्यूएस, ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1500 रुपये आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900 रुपये आहे.

या अभ्यासक्रमांना एनईईटी यूजीच्या माध्यमातून प्रवेश मिळतो

नीट यूजी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी लाइफ सायन्सेस आणि व्हेटर्नरी मेडिसीन या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा घेतली जाते.