GATE 2022 Result Declared : गेट परीक्षेचा निकाल जाहीर, gate iitkgp ac in वर पाहा तुमची कामगिरी

प्रतिष्ठित संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी खरगपूरनं (IIT Kharagpur) गेट परीक्षेचा निकाल (GATE 2022 Result) जाहीर केलाय.

GATE 2022 Result Declared : गेट परीक्षेचा निकाल जाहीर, gate iitkgp ac in वर पाहा तुमची कामगिरी
GATE
Image Credit source: GATE Web
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 2:36 PM

GATE 2022 Result Declared नवी दिल्ली: देशातील अनेक विद्यार्थी ज्या परीक्षेच्या (Exam) निकालाची वाट पाहत होते तो निकाल अखेर जाहीर झालाय. प्रतिष्ठित संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी खरगपूरनं (IIT Kharagpur) गेट परीक्षेचा निकाल (GATE 2022 Result) जाहीर केलाय. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी संस्थेची अधिकृत वेबसाईट gate.iitkgp.ac.in. येथे भेट द्यावी लागेल. निकाल आज जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना त्यांच स्कोअर कार्ड 21 मार्चपासून डाऊनलोड करता येणार आहे. आयआयटी खरगपूर निकालासोबत अंतिम उत्तरतालिका देखील जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांना गेटच्या पोर्टलला भेट देऊन त्यांच्या लॉगीनमधून निकाल पाहू शकतात.

निकाल कसा पाहाल?

  1. आयआयटी खरगरपूरची अधिकृत वेबसाईट gate.iitkgp.ac.in. भेट द्या
  2. गेटच्या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा गेट नोंदणी क्रमांक किंवा इमेल आयडी आणि पासवर्ड टाका
  4. सबमिट बटणावर क्लिक करा
  5. GATE 2022 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल
  6. हा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा

गेट उत्तरतालिका कशी डाऊनलोड करायची?

  1. आयआयटी खरगरपूरची अधिकृत वेबसाईट gate.iitkgp.ac.in. भेट द्या
  2. गेट 2022 चा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड द्वारे लॉगीन करा
  3. यानंतर तुम्हाला उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासंदर्भातील लिंक उपलब्ध होईल.
  4. यानंतर तुम्हाला आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटवर उत्तर तालिका उपलब्ध होईल.

ट्विट

इतर बातम्या :

VIDEO : परीक्षा केंद्रांवर Copy आढळल्याने Nanded मधील 7 शाळांना शिक्षण विभागाची नोटीस

VIDEO : The Kashmir Files टॅक्स फ्री करण्याची मागणी अयोग्य -Sanjay Raut