Fatima Sheikh social reformer : गुगलकडून महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त अभिवादन, फातिमा शेख कोण होत्या?

| Updated on: Jan 09, 2022 | 11:32 AM

सर्च इंजिन गुगलनं (Google) आज पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख (Fatima Sheikh) यांच्या जयंतीनिमित्त डुडलमधून (Doodle) अभिवादन केलं आहे. फातिमा शेख यांनी शिक्षणासोबत स्रियांच्या प्रश्नावर देखील काम केलं

Fatima Sheikh social reformer : गुगलकडून महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त अभिवादन, फातिमा शेख कोण होत्या?
Fatima Sheikh Google Doodle (Source : Google )
Follow us on

नवी दिल्ली: सर्च इंजिन गुगलनं (Google) आज पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख (Fatima Sheikh) यांच्या जयंतीनिमित्त डुडलमधून (Doodle) अभिवादन केलं आहे. फातिमा शेख यांनी शिक्षणासोबत स्रियांच्या प्रश्नावर देखील काम केलं.महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी काम केलं. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यामध्ये झाला.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात 1848 मध्ये सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं त्यावेळी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनी त्यांना राहण्यास जागा दिली होती. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. वर्ग, धर्म आणि लिंग मुळं शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं.

समतेसाठी काम

फातिमा शेख यांनी आयुष्यभर समता या तत्वाच्या प्रसारासाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणं फातिमा शेख यांना तत्कालीन समाजातील प्रस्थापित वर्गाकडून त्रास सहन करावा लागला. फातिमा शेख यांनी सत्यशोधक समाजाचं देखील काम केलं. भारत सरकारनं फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र 2014 मध्ये उर्दू पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता.

सावित्रीबाई फुले यांच्या पत्रात उल्लेख

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना 10 ऑक्टोबर 1856 मध्ये रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा उल्लेख केल्याचं दिसून येतं. सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी “फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही” असं लिहिलं आहे.

इतर बातम्या:

संजय राऊत यांचे व्याही कोरोना पॉझिटिव्ह, ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर होम क्वारंटाईन

Online admission process : RTE अंतर्गत 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 28 डिसेंबरपासून सुरू, सविस्तर वेळापत्रक पाहा

Google Honors Feminist Educator Fatima Sheikh with doodle on his 191 birthday