Helpline center for student | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; परीक्षेबाबतच्या शंका ,अडचणीचे सोडवण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

| Updated on: Feb 05, 2022 | 1:18 PM

जपासून या समुपदेशन व हेल्पलाईन कक्षा आजपासून सुरु होणार आहेत. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने याबाबत परिपत्रकाद्वारे नियंत्रण कक्षासंदर्भात माहिती प्रसिद्ध करत 9  विभागांना हे आदेश देण्यात आले आहेत. www.mahahsscboard.in  केली आहे. आपल्या शंका व अडचणीच्या संदर्भात विद्यार्थी व पालकांना त्यांच्या विभागासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत सकाळी 9 ते रात्री 7  पर्यंत या वेळेत संपर्क साधावा लागणार आहे.

Helpline center for student  | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; परीक्षेबाबतच्या शंका ,अडचणीचे सोडवण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
students
Follow us on

पुणे – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन (offline exam )घेण्यावरून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातवरण निर्माण झाला होता. ठिकठिकाणी आंदोलने करता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेची मागणीही केली होती. मात्र शालेय शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा या ऑफलाईन होणार असल्याचे घोषित करत परिक्षांचे वेळापत्रकही(Exam Time Tabel)  जाहीर केलं. त्यानंतर आता विद्यार्थी व पालकांसाठी एका हेल्पलाईनची सुविधा निर्माण केली आहे. या हेल्पलाईन कक्षाद्वारे(helpline room) परीक्षेच्या संदर्भात पालक व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत . आजपासून या समुपदेशन व हेल्पलाईन कक्षा आजपासून सुरु होणार आहेत. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने याबाबत परिपत्रकाद्वारे नियंत्रण कक्षासंदर्भात माहिती प्रसिद्ध करत 9  विभागांना हे आदेश देण्यात आले आहेत www.mahahsscboard.in  केली आहे. आपल्या शंका व अडचणीच्या संदर्भात विद्यार्थी व पालकांना त्यांच्या विभागासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत सकाळी 9 ते रात्री 7  पर्यंत या वेळेत संपर्क साधावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाला प्राधान्य
कोरोनाच्या महामारीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठापरिणाम झाला आहे. या हेल्पलाईनद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशनही केले जाणारा आहे परीक्षांचे नियोजन त्यासाठी करण्यात आलेलया उपाययोजना केंद्रांची माहिती अभ्यासक्रम परीक्षेचा कालावधी , तयारी यासारख्या अडचणी उदभवल्यातर या हेल्पलाईनशी संपर्क साधता येणार आहे.

प्रश्न पिढीची निर्मिती

दहावी – बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना लेखनाचा , अभ्यासाचा सराव व्हावा यासाठी परीक्षांत विचारलेल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा म्हणूनप्रश्न पेढी तयार करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून या प्रश्न पिढीची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावरhttp://www.maa.ac.in विषयानुसार प्रश्नपेढी अपलोड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी या प्रश्न पेढीचा उपयोग होणार आहे, असे माहिती एनसीईआरटीचे संचालक एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

Nagpur Crime | पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नागपुरात नेमकं काय घडलं?

थेट किराणा दुकानात शिरली भरधाव कार, नाशकातला अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद