थेट किराणा दुकानात शिरली भरधाव कार, नाशकातला अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

नाशिक(Nashik)च्या निफाड गावात एका मद्यधुंद कार(Car)चालकाचा ताबा सुटल्याने, कार थेट किराणा दुकानात घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही कार थेट किराणा दुकानातच घुसल्याने मोठा आवाज झाला. यात सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नसली तरी थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रदीप गरड

|

Feb 05, 2022 | 1:07 PM

नाशिक(Nashik)च्या निफाड गावात एका मद्यधुंद कार(Car)चालकाचा ताबा सुटल्याने, कार थेट किराणा दुकानात घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगाने आलेली ही कार थेट किराणा दुकानातच घुसल्याने मोठा आवाज झाला. या अपघातात सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नसली तरी या अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी या मद्यधुंद कार चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीतले दृश्यं पाहिल्यास आपल्याला या अपघाताची तीव्रता दिसून येते. जोरात आदळून किराणा दुकानातले सर्व साहित्य खाली पडले. तर दुकानदार जागेवरून उडाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. कार धडकते आहे, हे समजल्याबरोबरच दुकानमालक जागेवरून उठून उडी मारून पळाला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही. दुकानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे दुकानासमोर ग्राहकही होता. दोघेही तिथून पळाल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें