NEET PG 2022 Counselling संदर्भात महत्त्वाची माहिती! चॉइस फिलिंग प्रक्रियेला आजपासून सुरुवात

| Updated on: Sep 20, 2022 | 10:18 AM

या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mcc.nic.in पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे. लॉग इन करण्यासाठी आयडी, पासवर्ड यासारख्या माहितीद्वारे साइन इन करावे.

NEET PG 2022 Counselling संदर्भात महत्त्वाची माहिती! चॉइस फिलिंग प्रक्रियेला आजपासून सुरुवात
NEET PG Counselling
Image Credit source: Social Media
Follow us on

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (NEET-PG) समुपदेशन 2022 आजपासून सुरु होणारे. यात चॉइस फिलिंग प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे. ज्या उमेदवारांनी एमसीसी एनईईटी पीजी समुपदेशनासाठी नोंदणी केली आहे ही चॉईस फिलिंग (Choice Filling) प्रक्रिया पार पाडता येणार आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी (MCC) आज,20 सप्टेंबर 2022 पासून विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम आणि महाविद्यालयीन पर्याय आपल्या पोर्टलद्वारे भरण्याची परवानगी देणार आहे. या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mcc.nic.in पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे. लॉग इन करण्यासाठी आयडी, पासवर्ड यासारख्या माहितीद्वारे साइन इन करावे.

नीट पीजीच्या समुपदेशनासाठी चॉईस फिलिंगची ही प्रक्रिया 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रात्री 11.55 वाजेपर्यंत सुरु असेल. उमेदवार तोपर्यंत आपले पर्याय भरू शकतात. चॉईसला लॉक करण्यासाठी उमेदवारांना दुपारी 3 ते 11.55 पर्यंत वेळ मिळणार आहे.

नीट पीजी समुपदेशन सुरू झाले आहे आणि 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत संपणार आहे. एनईईटी पीजी समुपदेशन एकाधिक फेऱ्यांमध्ये केले जाईल.

उमेदवारांना त्यांनी भरलेली निवड आणि जागा उपलब्धतेच्या आधारे जागा वाटप केल्या जातील. पसंती भरताना उमेदवारांना आपला अभ्यासक्रम आणि कॉलेजची निवड भरावी लागणार आहे.

एकदा चॉईस फिलिंग झालं, पर्याय लॉक केले की उमेदवारांना पर्याय बदलता येणार नाही. पर्याय लॉक करण्याआधी उमेदवारांना पर्याय बदलता येऊ शकतो.

28 सप्टेंबर 2022 रोजी एनईईटी पीजी समुपदेशनाच्या पहिल्या फेरीचे जागा वाटप जाहीर केले जाईल. ज्या उमेदवारांना पहिल्या फेरीअंतर्गत जागा देण्यात येतील. त्यांना 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पुढील जॉइनिंग आणि रिपोर्टिंगसाठी जावे लागणार आहे.

एमसीसी अखिल भारतीय कोट्याच्या 50 टक्के जागांसाठी आणि डीम्ड / केंद्रीय विद्यापीठ / एएफएमएस आणि पीजी डीएनबीच्या 100 टक्के जागांसाठी एनईईटी पीजी समुपदेशन करीत आहे.

NEET PG Counselling 2022 मार्गदर्शक तत्त्वे

  • उमेदवार 30 ते 40 पर्याय निवडू शकतात. तसा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • उमेदवारांनी भरलेल्या पसंतीनुसार जागा वाटप केले जाणार आहे. क्रम व्यवस्थित, पसंतीनुसारच असावा.
  • एनईईटी पीजी समुपदेशन नोंदणी दरम्यान भरलेली सर्व माहिती बरोबर असावी.
  • सगळ्यात महत्त्वाचं, उमेदवारांनी आपली पसंती लॉक केली नाही तर तो पर्याय आपोआप लॉक होईल. एकदा लॉक झालेला पर्याय बदलता येणार नाही.
  • ‘नीट पीजी’ समुपदेशनाची नवी निवड फेरी 1 व 2 सोबतच मॉप-अप राऊंड कौन्सिलिंगमध्ये उपलब्ध असेल.