
जेईई मेन्स उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा (JEE Advanced Exam) देणार आहेत. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेची तारीख आधीच जाहीर करण्यात आली आहे. तसेच 23 ऑगस्ट रोजी ॲडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत त्यांनी या तारखांची काळजी घ्यावी. परीक्षेसाठीचे सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रवेशपत्रात जाहीर करण्यात येणार आहेत. जे जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण होतील ते जेईई ॲडव्हान्समध्ये बसतील. जेईई ॲडव्हान्सचा निकालही 11 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये (IIT Entrance) प्रवेश मिळेल.
इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठीच्या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा कम्प्युटर बेस्ड असेल. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा 2022 ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे रविवारी घेण्यात येणार आहे. जेईई मेन 2022 च्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या 2,50,000 मध्ये सामील होणारे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा 2022 साठी पात्र असतील. मात्र, दोन किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा रँक आणि स्कोअर सारखाच असेल तर ही संख्या 2.50 लाख पेक्षा थोडी जास्त असू शकते.
जेईई मेन्समध्ये चांगल्या पर्सेंटाइलद्वारे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा देता येणार आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला बसण्यासाठी एनटीएकडून विविध श्रेणींचा कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहे. जेईई ॲडव्हान्स्ड नोंदणी प्रक्रिया संपली आहे. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 2.6 लाख उमेदवारांपैकी एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 50 विदेशी नागरिक आहेत.