AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG 2022: नीट युजी Answer Key ची प्रतीक्षा! विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार, वाचा सविस्तर

NEET UG Answer Key 2022: नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती आणि यावर्षी 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

NEET UG 2022: नीट युजी Answer Key ची प्रतीक्षा! विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार, वाचा सविस्तर
NEET PG CounsellingImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 20, 2022 | 11:34 AM
Share

नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (National Eligibilty Entrance Test) अंडरग्रॅज्युएटची आन्सर की (NEET UG Answer Key 2022) आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आन्सर की जाहीर झाल्यानंतर, उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. एनटीए एनईईटी यूजी 2022 आन्सर की संदर्भात आक्षेप घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देईल. अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना तसे करण्याचा पर्याय असेल. त्यासाठी त्यांना neet.nta.nic.in लॉगइन करावं लागतं. आन्सर की संदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपाचा आढावा घेतल्यानंतर अंतिम उत्तर की आणि स्कोअरकार्ड (Answer Key And Scorecard) या महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नीट यूजी 2022 च्या निकालासोबतच गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात येणार आहे. नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती आणि यावर्षी 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

प्रवेशासाठी किती मार्क्स लागतात?

नीट यूजी 2022 पर्सेंटाइल हे ‘नीट’मधील ऑल इंडिया कॉमन मेरिट लिस्टमध्ये मिळालेल्या सर्वाधिक गुणांच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 50 पर्सेंटाइल आणावे लागणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 40 पर्सेंटाइल गुण मिळवावे लागतील. त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी किमान 45 पर्सेंटाइल गुणांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा कट ऑफ 720 ते 138 दरम्यान होता. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा कट ऑफ 137 ते 108असा होता.

टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दरवर्षी नीट यूजी परीक्षा घेतली जाते. देशातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्ली, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) चंदीगड, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमएस) वेल्लोर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (एनआयएमहन्स) बेंगळुरू, संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआयएमएस) लखनौ यासारख्या देशातील अव्वल वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनईईटीच्या आधारे प्रवेश दिला जातो.

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार