Maharashtra Board 10th Result 2025: दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, ‘टीव्ही 9 मराठी’वर मिळणार सर्वात आधी निकाल

SSC Result 2025 Maharashtra Board Date: दहावी परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. टीव्ही ९ मराठीवर हा निकाल सर्वात आधी मिळणार आहे.

Maharashtra Board 10th Result 2025: दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, टीव्ही 9 मराठीवर मिळणार सर्वात आधी निकाल
ssc result tv9 marathi
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 13, 2025 | 12:48 PM

SSC Result 2025 Maharashtra Board Date:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालाची प्रतिक्षा संपली आहे. बारावीपाठोपाठ आठवड्याभरात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. आता दहावी परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटवर सर्वात आधी निकाल मिळणार आहे. त्याची लिंक दुपारी एक वाजता अँक्टीव्ह होणार आहे. विद्यार्थ्यांना मेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेवसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.

दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली होती. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात त्यासाठी 5 हजार 130 मुख्य परीक्षा केंद्र होते. राज्यातून या परीक्षेला 16.11 लाख विद्यार्थ्या बसले होते. त्यात 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली होत्या. मागील वर्षी पेक्षा यावर्षी दहावीची परीक्षा लवकर झाली होती. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागणार आहे. बोर्डाच्या इतिहासात दहावीचा निकाल प्रथमच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता.

मेल किंवा व्हॉट्सअप असा मिळवा निकाल

मेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना मिळवता येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी दिलेल्या फार्मवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना निकाल मिळणार आहे.

टीव्ही ९ मराठीवर मिळवा निकाल

  • टीव्ही 9 मराठीचे यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/watch?v=hfwPLazLbd4
  • टीव्ही 9 मराठीचा शिक्षण विभाग– https://www.tv9marathi.com/education
  • टीव्ही 9 मराठीचे संकेतस्थळ – https://www.tv9marathi.com/
  • टीव्ही 9 मराठी LIVE – https://www.tv9marathi.com/live-tv
  • टीव्ही 9 मराठीच्या किंवा बोर्डाच्या वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
  • मग एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना तपशील भरावा लागणार आहे.
  • आता सबमिटवर क्लिक करा आणि तुमचा निकाल दिसेल.
  • तुमचा निकाल तपासा आणि गुणपत्रक डाउनलोड करा.

निकालाचे प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.