SSC Result 2025 Maharashtra Board Declared: दहावीचा आज निकाल, कुठे अन् कसा पाहता येणार निकाल जाणून घ्या
MSBSHSE Maharashtra Board Class 10th (SSC) Result 2025 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

SSC Result 2025 Maharashtra Board Declared Link active at 1pm on TV9: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. दहावी परीक्षाचा निकाल मंगळवारी 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षाचा निकाल जाहीर होणार आहे. 13 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल मिळणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात निकालाची एकंदरीत माहिती दिली जाणार आहे.
यंदा दहावीचा निकालही लवकर
गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लवकर झाल्या. त्यामुळे बारावीचा निकालही लवकर लागला होता. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होत आहे. दहावीच्या परीक्षेला सन 2024-25 मध्ये सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. संपूर्ण राज्यात त्यासाठी 5 हजार 130 मुख्य केंद्र होते.
निकाल कसा पाहणार?
दहावीचा निकाल टीव्ही 9 मराठी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या लिंकवर दहावीचा निकाल मिळणार आहे.
- टीव्ही 9 मराठीचे यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/watch?v=hfwPLazLbd4
- टीव्ही 9 मराठीचा शिक्षण विभाग– https://www.tv9marathi.com/education
- टीव्ही 9 मराठीचे संकेतस्थळ – https://www.tv9marathi.com/
- टीव्ही 9 मराठी LIVE – https://www.tv9marathi.com/live-tv
- टीव्ही 9 मराठीच्या किंवा बोर्डाच्या वेबसाईटवर जा.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
- मग एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना तपशील भरावा लागणार आहे.
- आता सबमिटवर क्लिक करा आणि तुमचा निकाल दिसेल.
- तुमचा निकाल तपासा आणि गुणपत्रक डाउनलोड करा.
बारावीचा 91.88 टक्के होता निकाल
5 मे रोजी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. बारावीचा निकाल एकूण 91.88 टक्के लागले होता. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली होती.उत्तीर्ण होण्याऱ्या मुलींची एकूण टक्केवारी 94.58 टक्के इतकी होती तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 89.51 टक्के होता.
