AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board 10th Result 2025 Date and Time : 12 वी झाली आता 10 वीची पाळी… कधी लागणार रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

MSBSHSE Maharashtra Board Class 10th (SSC) Result 2025 Date and Time News and Update in Marathi : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण 12 वीच्या निकालानंतर आता लवकरच 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता या महिन्यात जाहीर होणार आहे. कधी लागणार निकाल, कोणत्या साईटवर पाहणार, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा.

Maharashtra Board 10th Result 2025 Date and Time : 12 वी झाली आता 10 वीची पाळी... कधी लागणार रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर
10 वीचा निकाल कधी ?Image Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 11:09 AM
Share

कोणतीही परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार याची प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटते. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या 12 वीचा निकाल नुकताच लागला, त्याच पाठोपाठ आता इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकताही ताणली गेली आहे. यंदा लाखो विद्यार्थ्यांनी 10 वीची परीक्षा दिली, त्याचा निकाल कधी लागणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून SSC अर्थात इयत्ता 10 वीचा निकाल  (Maharashtra Board 10th Result)लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्या निकालाची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप अधिकृत रित्या जाहीर झालेली नाही. पण लवकरच त्या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते. हा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 10 वीची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सवर आपला निकाल चेक करू शकतात.

12 वी प्रमाणेच इयत्ता 10वीचे निकालही आधी सकाळी प्रेस कॉन्फरन्सद्वारे जाहीर करण्यात येतील, त्यावेळी या वर्षीच्या परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे तपशील शेअर केले जातील. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, विद्यार्थ्यांची संख्या, विभागवार निकाल इत्यादींचा समावेश त्यामध्ये असेल. यावर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि 17 मार्च रोजी संपली. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिल्या शिफ्टमध्ये ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत तर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत ही परीक्षा पार पडली.

कसा पहाल रिझल्ट ?

सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.

आता सबमिट वर क्लिक करा आणि तुमचा निकाल दिसेल.

तुमचा निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.

भविष्यातील वापरासाठी याची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

2024 साली कसा लागला होता 10 वीचा रिझल्ट ?

गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. त्यावेळी एकूण 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. तर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख 84 हजार 431 इतकी होती. म्हणजेच एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 टक्के होती. यामध्ये मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 97.21 टक्के आणि मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 94.56 टक्के होता. कोकण विभागाने 99.01 टक्के निकालासह सर्वाधिक कामगिरी केली, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी, 94.73 टक्के इतका होता.

12 वीचे निकाल जाहीर

गेल्या आठवड्यात म्हणजेच 5 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर करण्यात आले होते. या वर्षी 12वीचे एकूण 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि मुलींनी दरवेळीप्रमाणेयंदाही निकालात बाजी मारली. उत्तीर्ण होण्याऱ्या मुलींची एकूण टक्केवारी 94.58 टक्के इतकी होती तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 89.51 टक्के होता.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.