Maharashtra 12th Result 2026 Declared LIVE at TV9 Marathi : बारावीचा निकाल जाहीर, शाब्बास पोरींनो.. मुलीच ठरल्या वरचढ..

Maharashtra 12th Result 2026 : अखेर काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून या निकालाची घोषणा करण्यात आली. यंदा मुलींनी निकालात बाजी मारली.

Maharashtra 12th Result 2026 Declared LIVE at TV9 Marathi : बारावीचा निकाल जाहीर, शाब्बास पोरींनो.. मुलीच ठरल्या वरचढ..
12th result maharashtra board 2026
| Updated on: May 02, 2026 | 11:53 AM

आज 2 मे 2026 रोजी बारावी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. 12वी (HSC) बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान राज्यात घेण्यात आली. सुरळीतपणे राज्यभरात या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालीच उत्सुकता होती. अखेर निकाल जाहीर झाली. बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर करण्यात आला. नेहमीसारखेच राज्यात यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. निकालात मुलींचा टक्का वाढला आहे. विभागीय निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली. बोर्डाने निकालाबद्दल सांगताना म्हटले की, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा निहाय समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती. हेल्पलाईन सुरू केली होती. 153 विषयांची परीक्षा झाली.

निकालात कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभाग अव्वल ठरला. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूर पॅटर्नला या निकालात मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी बोर्डाने जोर दिला. यादरम्यान मोठी कारवाई आणि 15 एफआयआर दाखल करण्यात आल्या. 2024 मध्ये एक दीड टक्क्याने कमी लागला आहे. दर वर्षी दीड दोन टक्के निकाल कमी लागत आहे.

नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला वाणिज्य आयटीआयसाठी 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास झालेले विद्यार्थी 89.79. खासगी विद्यार्थी 17 फॉर्म भरणारे 36 हजार 941 प्रविष्ट झाले. उत्तीर्ण झालेले 29 हजार634. टक्केवारी 80.21 रिपीटर एकूण 50 हजार 346 विद्यार्थी 18 हजार 349 उत्तीर्ण.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. दरवर्षी निकालात कायमच मुली अव्वल असतात. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासोबतच कोकण विभागाने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. निकाल कोकण विभागच अव्वल ठरला. आता काही मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. बोर्डाकडून 7 वेबसाईट जाहीर करण्यात आल्यात, त्यात www.tv9marathi.com चाही समावेश आहे. तुम्ही टीव्ही9 च्या होम पेजवर बारावीचा निकाल आरामात बघू शकता.

Follow Us