Maharashtra Board SSC Result 2021 declared: अकरावी प्रवेशासाठी सीईटी कधीपर्यंत होणार? बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले?

| Updated on: Jul 16, 2021 | 4:03 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

Maharashtra Board SSC Result 2021 declared: अकरावी प्रवेशासाठी सीईटी कधीपर्यंत होणार? बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल, मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आहेत. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अकरावीच्या सीईटी परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करु, असं दिनकर पाटील म्हणाले.

दिनकर पाटील नेमकं काय म्हणाले?

अकरावीसाठी सीईटी शासनानं जाहीर केली आहे. सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर करु, सीईटी घेण्याचे आदेश राज्य मंडळाला मिळाले आहेत, असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले. सीईटी संदर्भात न्यायालयीन बाब आहे का असं विचारलं असता त्यांनी न्यायालयात काही पेंडिंग नाही असं सांगितलं.

सीईटी परीक्षेच्या नोंदणीसाठी पोर्टल कधी सुरु होणार?

आम्ही सीईटी परीक्षेचं वेळापत्रक तयार करत आहोत आणि पुढे जाणार आहोत. ही परीक्षा वैकल्पिक ठेवली आहे. जे विद्यार्थी सीईटी देऊ इच्छितात त्यांच्यासाठी पोर्टल सुरु करु, असं दिनकर पाटील म्हणाले. सीईटीची डेडलाईन 21 ऑगस्ट पर्यंत जाईल. सीईटीसंदर्भात बोर्डाकडून लवकरच नोटिफिकेशन जारी केलं जाईल.

इंग्रजी विषय सर्व बोर्डांमध्ये

अनेक भाषा आहेत पण इंग्रजी हा विषय सर्व बोर्डांसाठी असतो. इंग्रजी हा विषय सगळीकडे सारखा असतो. इंग्रजीचं व्याकरण सगळीकडं सारखं असतं. दहावीपर्यंत इंग्रजी ही दुसरी भाषा असते, त्यामुळे सीईटीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, असंही दिनकर पाटील म्हणाले.

?अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल??
➡️ अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा

?इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा

?प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

?गुण – 100

?बहुपर्यायी प्रश्न

?परीक्षा OMR पद्धतीने

?परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

➡️कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?

?CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश

?CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

?त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश

?CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

इतर बातम्या:

Maharashtra SSC Result 2021 Declared: दहावीचा निकाल तासाभरापासून रखडला, वेबसाईट ठप्प, विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

Maharashtra SSC Result 2021: दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘नेत्रदीपक’ कामगिरी; 97.84% निकाल लागला!

Maharashtra Board SSC Result 2021 declared board president Dinkar Patil said cet schedule for fyjc admission will announced soon