Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर, सीट नंबर कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स

| Updated on: Aug 03, 2021 | 12:17 PM

Maharashtra Board HSC 12th Exam Result 2021 Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून दुपारी चार वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर, सीट नंबर कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स
बारावीचा बैठक क्रमांक सा शोधायचा
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल आज दुपारी 4 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणं आवश्यक होतं. मात्र, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निकाल आज जाहीर होत आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा
स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा
स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

इतर बातम्या:

HSC Result date 2021 : महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच!

HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता? सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार