HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता? सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल ३० जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.

HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता? सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार
प्रातिनिधिक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 31, 2021 | 3:20 PM

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. बोर्डाकडून यापूर्वी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी निकालाचं काम करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती, ती देखील संपली असल्यानं निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांसदर्भात देशातील सर्व बोर्डांना महत्वाचा आदेश दिला आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई (CBSE) आणि सीआयएसीई (CICSE) आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.  कोर्टान हा आदेश 24 जूनला दिला होता.

इतर बातम्या: 

CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेची घोषणा, परीक्षेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

CBSE 12th Result 2021 : बारावीच्या निकालासंदर्भात सीबीएसईची महत्वाची नोटीस, येथे पाहा

HSC Result 2021 Maharashtra msbshse will be declare class 12 result on 30 july said by sources

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें