AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलमध्ये नेटवर्क वारंवार जातं? ‘या’ टिप्स करा फॉलो आणि मिळवा फुल्ल नेटवर्क

मोबाईल नेटवर्क बिघाड ही प्रत्येक मोबाईल युजरला भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. पण, काही टिप्स वापरल्या तर हा प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह होऊ शकतो.

मोबाईलमध्ये नेटवर्क वारंवार जातं?  'या' टिप्स करा फॉलो आणि मिळवा फुल्ल नेटवर्क
मोबाईल नेटवर्कImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 2:40 PM
Share

आपल्यापैकी अनेकांसोबत असे झाले असेल की फोनवर बोलत असताना अचानक समोरील व्यक्तीचा आवाज बंद होतो आणि जेव्हा फोन पाहतो तेव्हा कळते की नेटवर्क गायब झालं आहे. ही समस्या सामान्य आहे आणि दररोज मोबाईल वापरकर्त्यांना याचा सामना करावा लागतो. तर आपल्या देशातील काही दुर्गम भाग असो वा प्रवास करताना ही समस्या आणखी गंभीर होते, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत आणि मेसेज पाठवता येत नाहीत. तर आजच्या लेखात आपण काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला मोबाईल नेटवर्कच्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊयात.

लोकेशन शोधा

तुम्ही तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट‍ जागेवर जाताच तुमचे मोबाईल नेटवर्क बंद पडते का? जर असे असेल तर, ही समस्या अनुभवणारे तुम्ही एकटे नाही आहात. बिल्डिंग बांधताना वापरण्यात आलेले काही गोष्टींमुळे कधीकधी नेटवर्क ब्लॉक होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुम्हाला कॉल अटेंड करण्यासाठी तुमच्या घराच्या बाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर यावे लागते.

फोन रीस्टार्ट करा

तुमच्या फोनमध्ये सतत नेटवर्कची समस्या सतावत असते तेव्हा आपण जवळच्या मोबाईल टॉवरचा शोध घेत फोन फिरवत असतो. अशा परिस्थितीत तुमचा फोन रीस्टार्ट करा. एकदा रीस्टार्ट झाल्यावर फोन आपोआप जवळच्या टॉवरशी कनेक्ट होईल.

तुमचा फोन अपडेट ठेवा

कधीकधी सॉफ्टवेअरमधील बिघाडांमुळे तुमचा फोन नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकत नाही. सुरुवातीच्या वेळेस आयफोन 17 सिरीजमध्येही असेच घडले होते , त्यानंतर ॲपलने ही समस्या सोडवण्यासाठी एक अपडेट जारी केला. म्हणून तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा.

बॅटरी चार्ज करणे

बॅटरी चार्ज होण्याचा थेट संबंध नेटवर्कशी होत असतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. खरं तर जेव्हा बॅटरी कमी असते तेव्हा फोनची सिस्टम सिग्नल अँटेनासह विविध घटकांना जाणारी पॉवर कमी करते. परिणामी फोनचा अँटेना सिग्नल योग्यरित्या शोधू शकत नाही. तर हे टाळण्यासाठी तुमच्या फोनची बॅटरी चार्ज ठेवा.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार