गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला, म्हणाले,’बाटलीतील भूत बाहेर काढल्यानं…’
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 'बाटलीतील भूत बाहेर काढल्यानं अंगाशी आल्याची टीका नाईक यांनी शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली.

ठाण्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात आपापसात आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात भाजप आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. त्यात गणेश नाईक यांच्याकडून सातत्याने एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले जात आहे. नाईकांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.
गणेश नाईक म्हणाले, ‘फडणवीस सरकारमधील सर्व मंत्री टेन्शनमध्ये आहेत. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु धर्म आणि जातीच्या नावाने सर्व सुरू आहे. त्याचा ताप राज्यकर्त्यांना होऊ लागला आहे. काही लोकांनी लावलेल्या आगी विझेना झाल्या आहेत. बाटलीमधील भूत बाहेर काढल्याने आता अंगाशी येत आहे. त्यामुळे बाटलीबाहेर काढलेली भुतं परत बंद करण्याची ज्या व्यक्तीत ताकद असेल, त्यांनीच आता बाहेर काढावीत, अशा शब्दात मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. गणेश नाईकांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही टीका केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा होत असल्याचे दिसत आहे.
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत, शिंदे काय बोलणार?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मागील 15 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. काल त्यांनी मुंबईत जाऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु मागण्या पूर्ण न केल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी काल शनिवारी मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आले. त्यांनी मुंबईत मागण्या पूर्ण करूनच अंतरवाली सराटीत परतणार असल्याचे स्पष्ट केले. याच आंदोलनावरून मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर अप्रत्यक्षरित्या आंदोलन केलं. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याने जुन्या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
