Maharashtra HSC Result 2021 declared LIVE Updates : बारावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, निकालासाठी इथे क्लिक करा

| Updated on: Aug 04, 2021 | 6:31 AM

Maharashtra Board HSC 12th Exam Result 2021 Declared : बारावीचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in आणि  https://msbshse.co.in या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होईल. मात्र बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन टक्केवारी जाहीर केली.

Maharashtra HSC Result 2021 declared LIVE Updates : बारावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, निकालासाठी इथे क्लिक करा
बारावी निकाल वेबसाईट सुरु

Maharashtra HSC Result 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी जाहीर केली. विद्यार्थ्यांमध्ये  निकालाची उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021)  आहे. बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल  आज दुपारी 4 वाजता वेबसाईटवर पाहता येणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.inhttps://msbshse.co.in , hscresult.mkcl.org   आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

निकालाची विभागवार टक्केवारी

१) कोकण : ९९.८१ २) मुंबई : ९९.७९ ३) पुणे : ९९.७५ ४) कोल्हापूर : ९९.६७ ५) लातूर : ९९.६५ ६) नागपूर : ९९.६२ ७) नाशिक : ९९.६१ ८) अमरावती : ९९.३७ ९) औरंगाबाद : ९९.३४

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Aug 2021 04:37 PM (IST)

    आवडीचे क्षेत्र निवडून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन, अजित पवार यांच्याकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन

    मुंबई :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून शिक्षणाचा आनंद घ्यावा. जीवनात यशस्वी व्हावे. देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करून उपमुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. 99.81 टक्के निकालासह कोकण विभाग बारावीच्या मूल्यांकनात राज्यात अव्वल ठरला असून अन्य विभागांचा निकाल 99 टक्क्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतून 99.63 टक्के विद्यार्थी बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे मी अभिनंदन करतो. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असंच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी बारावी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 03 Aug 2021 04:10 PM (IST)

    बारावी निकालाच्या चारही वेबसाईट व्यवस्थितपणे सुरु

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावी निकालासाठी जारी केलेल्या चारही वेबसाईट सुरु असून सध्यातरी दहावीच्या निकालासारखी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झालेली नाही.

    1. https://hscresult.11 thadmission.org.in

    2. https://msbshse.co.in

    3. hscresult.mkcl.org 

    4. mahresult.nic.in.

  • 03 Aug 2021 02:04 PM (IST)

    एमसीव्हीसी शाखेचा निकाल 98.8 टक्के सर्वाधिक निकाल

    एकूण निकाल 99.63 टक्के विज्ञान - 99.45 टक्के कला - 99.83 टक्के वाणिज्य 99.81 टक्के एमसीव्हीसी - 98.8 टक्के

  • 03 Aug 2021 02:04 PM (IST)

    इयत्ता बारावीचा एकूण निकाल 99.63 टक्के

    इयत्ता बारावीचा निकाल : एकूण निकाल 99.63 टक्के विज्ञान - 99.45 टक्के कला - 99.83 टक्के वाणिज्य 99.81 टक्के एमसीव्हीसी - 98.8 टक्के पत्रकार परिषद लाईव्ह

  • 03 Aug 2021 02:02 PM (IST)

    दुपारी चार वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निका

    कोविड मुळे बारावीची परीक्षा यंदा घेता आली नाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलाय दुपारी चार वाजता ऑनलाईन निकाल पहात येणार महापुरामुळे निकाल उशिरा जाहीर होतोय

  • 03 Aug 2021 02:02 PM (IST)

    बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला, दिनकर पाटील यांची माहिती

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.  मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील  निकाल जाहीर करणार आहेत. मंडळानं परीक्षा घेण्याचं जाहीर केलं होतं.  पहिल्यांदा परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. बोर्डानं निकाल कसा तयार करायचा यासंदर्भात सूत्र ठरवलं. महाविद्यालयांनी निकाल तयार केला. त्यानुसार निकाल दुपारी जाहीर करत आहोत. बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे.

  • 03 Aug 2021 01:48 PM (IST)

    बारावीचा निकाल कसा पाहायचा? वर्षा गायकवाड यांचं विद्यार्थ्यांसाठी खास ट्विट

    बारावीचा निकाल कसा पाहायचा? वर्षा गायकवाड यांचं विद्यार्थ्यांसाठी खास ट्विट

  • 03 Aug 2021 12:25 PM (IST)

    बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

    बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

    स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल

  • 03 Aug 2021 11:16 AM (IST)

    बारावीच्या विद्यार्थ्यांनी राज्याचा नावलौकिक वाढवावा, वर्षा गायकवाड यांच्याकडून निकालासाठी शुभेच्छा

    मागच्या वेळचा अनुभव बघता आपण पूर्ण तयारी केलेली आहे. यावेळी आम्ही पाच लिंक देत आहोत. तांत्रिक लोकांशी चर्चा करुन पूर्ण काळजी घेत आहोत. बारावीच्या निकालाच्या वेळी व्यवस्थापन करण्यास बोर्डाला सांगितलं आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकालासाठी सर्वांना शुभेच्छा देते. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

    ग्रामीण भागात शाळा सुरु केलेल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की गेल्या दीड वर्षांपासून मुलं घरी आहेत. मुलं घरी बसून वैतागली आहेत, त्यांना घराबाहेर पडावं असं वाटत आहे. पालकांचीही मागणी शाळा सुरु करण्यासंदर्भात आहे. शहरी भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे फाईल दिली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

  • 03 Aug 2021 10:42 AM (IST)

    बोर्डाच्या 9 विभागीय मंडळांनी तयार केलेला निकाल जाहीर होणार

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

  • 03 Aug 2021 10:39 AM (IST)

    कोरोनामुळं परीक्षा रद्द

    कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

  • 03 Aug 2021 10:38 AM (IST)

    बारावीचा निकाल कसा पाहाल ?

    बारावीचा निकाल कसा पाहाल ?

    निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डानं दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर भेट द्यावी.

    त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

    त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

    त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

    यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

    निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

  • 03 Aug 2021 10:37 AM (IST)

    बारावीचा निकाल कुठे पाहायचा?

    विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.inhttps://msbshse.co.in , hscresult.mkcl.org   आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

  • 03 Aug 2021 10:36 AM (IST)

    बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

    महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

Published On - Aug 03,2021 10:34 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.