महिला आयएएस अधिकाऱ्याची मार्कशीट व्हायरल, किती टक्के मिळाले?, तुम्ही…
आयएएस अधिकारी सोनल गोयल यांची पोस्ट ही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोनल गोयल यांनी शेअर केलेली ही पोस्ट लोकांना चांगलीच आवडताना देखील दिसत आहे. सोनल गोयल यांनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास देखील सांगितल्याचे या पोस्टमधून दिसत आहे.

मुंबई : सोशल मीडियावर एक मार्कशीट सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही मार्कशीट चक्क एका महिला आयएएस अधिकाऱ्याची आहे. ही मार्क शीट नक्कीच प्रेरणादायी आहे. ही मार्क शीट दुसरी तिसरी कोणाचीही नसून आयएएस अधिकारी सोनल गोयल यांची आहे. ही त्यांनीच सोशल मीडियावर शेअर केलीये. या मार्क शीटवरून त्यांचा प्रेरणादायी प्रवास दिसतोय. नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांनी त्यांचा प्रवासाबद्दल सांगितले.
सोनल गोयल यांनी त्यांची ही मार्कशीट 21 फेब्रुवारी 2024 ला सोशल मीडियावर शेअर केलीये. त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2007 मुख्य मार्कशीटचा फोटो शेअर शेअर केलाय. या पोस्टमध्ये त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नामध्ये आलेल्या अपयशाबद्दल सांगितले. जे खरोखरच प्रेरणादायी नक्कीच आहे.
2007 मध्ये अपयश आणि थेट 2008 मध्ये मिळालेले यश याबद्दलचा अनुभव हा सांगण्यात आलाय. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना सामान्य अध्ययन या पेपरमध्ये कमी मार्क मिळाल्याने त्यांना मुलाखतीसाठी फोन नाही आला. मात्र, त्यानंतर त्यांनी काही गोष्टी पक्क्या करत काम केले. या काळात त्यांनी खूप जास्त परीश्रम हे घेतले.
Nostalgic moment as I came across my #UPSC Civil Services 2007 #Mains marksheet, reminding me of the trials and triumphs that led to final selection in #May2008 Results 🙏🏻
I just want to share with the aspirants that in my first attempt, I fell short of getting an Interview call… pic.twitter.com/9VY8k6sFqQ
— Sonal Goel IAS 🇮🇳 (@sonalgoelias) February 21, 2024
या पोस्टच्या माध्यमातून सोनल गोयल या विद्यार्थ्यांना मोठा संदेश देताना नक्कीच दिसत आहेत. काहीही झाले तरीही आपण आपल्या लक्षापासून दूर नाही गेले पाहिजे हे सांगताना सोनल गोयल या दिसत आहेत. सोनल गोयल यांनी म्हटले की, प्रत्येक अपयश ही शिकण्याची, सुधारण्याची आणि शेवटी जिंकण्याची संधी असते…
सोनल गोयल यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. लोक सोनल गोयल यांचे काैतुक करताना दिसत आहेत. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्हाला कोणतीही ताकद त्यापासून रोखू शकत नसल्याचे सांगताना सोनल गोयल या दिसत आहेत. लोकांना सोनल गोयल यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच आवडताना देखील दिसत आहे.