NAS 2021 : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण यशस्वी, 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थी सहभागी

| Updated on: Nov 14, 2021 | 11:55 AM

देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण घेण्यात आलं आहे. नॅस अंतर्गत देशभरातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो.

NAS 2021 : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण यशस्वी, 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थी सहभागी
नॅस
Follow us on

नवी दिल्ली: देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण घेण्यात आलं आहे. नॅस अंतर्गत देशभरातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो. यावर्षी हा सर्वे देशभरातील 36 राज्यातील 733 जिल्ह्यातील 1.23 लाख शाळांमध्ये घेण्यात आला. देशभरातील एकूण 38 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीवर

नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण दर तीन वर्षांनी करण्यात येते. यापूर्वीचा सर्वे 2017 मध्ये करण्यात आला होता. 2020 मध्ये नियोजित वेळेप्रमाणं सर्वेक्षण होणं आवश्यक होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीवर पडलं होतं. अखेर नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण 12 नोव्हेंबरला घेण्यात आलं.

नॅस 2021 चा निकाल जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर तयार केला जाणार आहे. नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षणाद्वारे राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशातील शिक्षण क्षेत्रातील समस्या समजण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणाद्वारे मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करुन केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्यानुसार पावलं उचलणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केल्यानंतर देशभरातील 36 राज्यातील 1.23 लाख शाळांमध्ये नॅस सर्वेक्षण करण्यात आलं, अशी माहिती केंद्रीय शिक्षण विभागाच्यावतीनं देण्यात आली आहे.

नॅस सर्वेक्षणात तिसरी आणि पाचवीच्या वर्गासाठी भाषा विषय, गणित आणि पर्यावरण यासंबंधी विद्यार्थ्यांचं ज्ञान तपासलं गेलं. भाषा विषय, गणित, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान विषयाची चाचणी आठवीच्या वर्गासाठी घेतली गेली तर दहावीच्या वर्गासाठी भाषा विषय, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यात आली.

22 माध्यमांमध्ये चाचणी

नॅशनल अ‌ॅचिव्हमेंट सर्वेक्षण हे एकूण 22 माध्यमांमध्ये करण्यात येईल. आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मनिपुरी, मराठी, मिझो, ओडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू, उर्दू, बोडो, गारो, खासी, कोंकणी, नेपाळी, भुतिया, लेपचा या भाषांच्या माध्यमामध्ये ही चाचणी घेतली गेली.

नॅस सर्वेक्षणाचा उद्देश

नॅशनल अ‌ॅचिव्हमेंट सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थ्याना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे. विद्यार्थ्यांच्या अडचणीवर समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार ठरणार आहे. नॅसमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकारी अनुदान प्राप्त आणि विनाअनुदानीत शाळा यां सहभागी होणार आहेत.

इतर बातम्या:

NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात

GATE Exam 2022 : गेट परीक्षाअर्जात सुधारणा करण्यास मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी

National Achievement Survey 2021 96 percentage school and 92 percentage students participate in survey