इथे पत्नी नाही तर चक्क पती भाड्यानं मिळतात, सुंदर तरुणींची होते गर्दी, एका तासाचं भाडं ऐकून बसेल धक्का
या महिला आपला पती म्हणून पुरुषांना रेंटने घेतात, त्यांना तासाप्रमाणे मोबदला दिला जातो. जो पुरुष रेंटने घेतला आहे, त्याला ती महिला जे काम सांगेल ती सर्व कामे करावी लागतात. त्याबदल्यात त्यांना चांगला मोबदला देखील भेटतो.

स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरामध्ये आलेल्या असमानतेमुळे आज जगभरातील अनेक देश मोठ्या संकटात सापडले आहेत. भारताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये देखील स्त्री आणि पुरुषांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. भारतामध्ये स्त्री भ्रूणहत्या सारख्या काही समाजविघातक गोष्टींमुळे देशात स्त्रीयांची संख्या कमी झाले आहे, तर पुरुषांची संख्या अधिक वाढली आहे, यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक लोकांना आता लग्नासाठी मुलगीच मिळत नाहीये. जसं लिंगगुणोत्तरामध्ये असलेल्या असमानतेचा फटका हा भारतला बसत आहे, तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त फटका हा जगातील इतर देशांना देखील बसत आहे. मात्र तिथे भारताच्या अगदी उलट चित्र आहे, या देशामध्ये पुरुषांची संख्या कमी झाल्यामुळे येथील सुंदर तरुणींवर पतीला भाडे करारावर घेण्याची वेळ आली आहे.
लातविया देशामध्ये सध्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं येथील महिलांवर पती रेंटने घेण्याची वेळ आली आहे, अशा पुरुषाला या देशात तासाप्रमाणे पैसे दिले जातात. या देशातील सुंदर तरुणी पती म्हणून ज्या पुरुषाला रेंटने घ्यायचं आहे, त्याच्यासोबत विशिष्ट असा भाडेकरार करतात, त्याला त्यानुसार दर तासाच्या हिशोबाप्रमाणे पैसे दिले जातात. या महिला त्यानंतर या पुरुषाकडून घरातील सर्व कामे करून घेतात. या देशात जास्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं अशा पुरुषांचा उपयोग हा मेहनतीचे कामे करून घेण्यासाठी देखील केला जातो.
द न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार लातविया देशामध्ये पुरुषांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळे येथील महिलांवर पुरुष भाड्यानं घेण्याची वेळ आली आहे. येथील महिला घरातील कामांसाठी पुरुष भाड्यानं घेतात, त्याला दर तासाला 3 ते 4 डॉलर एवढा मोबदला दिला जातो. त्याच्याकडून घरातील सर्व मेहनतीची कामे करून घेतली जातात, तसेच काही महिला पती म्हणून देखील पुरुष भाड्यानं घेतात, त्याला देखील तेवढाच मोबदला दिला जातो.
अशा पुरुषांची बुकिंग ही वेबसाईटच्या माध्यमातून केली जाते. एका रिपोर्टनुसार काही विशिष्ट वेबसाईट अशा प्रकारच्या सेवा देतात, या महिला या वेबसाईटवर आपल्या गरजेनुसार पुरुष भाडे करारावर घेतात. त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो.
